माजी पोलीस आयुक्त Parambir Singh यांची डोकेदुखी वाढली, खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाणे पोलीस स्थानकात खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती मिळवलेल्या प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान याने केला.

एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडून देखील सवा कोटींची वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्याने केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे आणि एन टी कदमसारख्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकल्याचा आरोपही त्याने केला आहे.

महत्वाचं म्हणजे यातील एन टी कदम याने दोन वेळा विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पदक देखील मिळाले आहे. राजकुमार कोथमिरे यांची बदली गडचिरोली येथे झाली असली तरी त्यांच्या विरोधात देखील आपण तक्रार दिल्याचे जालान याने सांगितलं आहे. विमल अगरवाल, जुबेर अन्सारी सारखे पोलिसांचे एजंट ही सगळी वसुली करत असल्याचा गौप्यस्फोट त्याने केला आहे.

ADVERTISEMENT

आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांना मदतीचे आवाहन दिल्यावर सगळी सूत्र हलून आपल्याला आज न्याय मिळत आल्याची भावना जालान याने व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

परमबीर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त पदावर असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल करून देण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांच्या नशिबाचे फासेच उलटे पडले असून अनेक गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

‘अटकेपासून वाचायचंय तर 10 कोटी दे’, क्रिकेट सट्टेबाजाचा परमबीर सिंगांविरोधात CID कडे जबाब

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कारप्रकरणानंतर माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाल्यानंतर या प्रकरणी हलगर्जी केल्याप्रकरणी परमबीर सिंग यांना देखील मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात आलं होतं. त्यानंतर परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुली खळबळजनक आरोप केला होता. तेव्हापासून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहे.

मात्र, आता थेट परमबीर सिंग यांच्याविरुद्धच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता परमबीर सिंग हे अधिक अडचणीत येऊ शकतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT