माजी मंत्री संजय देवतळे यांचं निधन; कोरोनाच्या उपचारांदरम्यान हृदयविकाराचा झटका
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचं आज निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यासाठी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. संजय देवतळे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली असता चाचणीची अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्यावर […]
ADVERTISEMENT
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचं आज निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यासाठी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं.
ADVERTISEMENT
संजय देवतळे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली असता चाचणीची अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या सहा दिवसांपसून देवतळे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अचानक त्यांना उपचारांदरम्यान हृदयविकाराचा झटका आला.
संजय देवतळे यांनी 4 वेळा काँग्रेसकडून वरोरा मतदारसंघातील आमदार होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाचा देखील भार देवतळे यांनी सांभाळला होता. 2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला होता.
हे वाचलं का?
दरम्यान देवतळे यांच्या निधनानंतर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला. देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असुन या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणुन त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभाग़हात मांडणारा अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT