मुंबई विमानतळावर ७५ लाखाच्या सोन्याची तस्करी करणारा विदेशी नागरिक अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई विमानतळावर सोनं आणि अन्य महागड्या वस्तूंच्या तस्करीच्या घटना अजुनही सुरुच आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाने सुदानवरुन आलेल्या एका परदेशी नागरिकाला ७५ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी करत असताना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, हा नागरिक सुदानवरुन शारजा मार्गे मुंबईत दाखल झाला होता. विमानतळातून बाहेर पडताना या नागरिकाने आपल्याजवळचं सोनं paste form मध्ये ट्रॉलीच्या मध्ये लपवलं होतं. आपलं सोनं पकडलं जाऊ नये यासाठी या परदेशी नागरिकाने पॅसेंजर ट्रॉलीच्या दोन रॉडमध्ये अतिशय क्लपकतेने लपवलं होतं.

परंतू मुंबई विमानतळावद दाखल झाल्यानंतर प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली जात असताना ट्रॉलीमध्ये हे सोनं कस्टम विभागाला आढळून आलं. या सोन्याचं वजन १८६१ ग्रॅम इतकं भरलं असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत ७५ लाखांपेक्षा जास्त असल्याचं कळतंय. याचदरम्यान आणखी एका प्रसंगात प्रवाशांना व्हिलचेअर पुरवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या संगनमताने परदेशी चलन बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला कस्टम विभागाने अटक केली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती कर्मचाऱ्याच्या मदतीने ६० हजार अमेरिकन डॉलर बाहेर नेण्याचा प्रयत्न करत होता. भारतीय रुपयाप्रमाणे या अमेरिन डॉलर्सची किंमत ४४ लाखांच्या घरात आहे. कस्टम विभागाने या प्रवाशासह व्हिलचेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे.

‘भिशी’मध्ये शेकडो लोकांची फसवणूक, तब्बल 200 कोटींचा घोटाळा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT