नागपूरमध्ये कोरोनाचा कहर ! एकाच दिवसात सापडले ३ हजार ७९६ रुग्ण
महाराष्ट्राच्या उप-राजधानीला बसलेला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये नागपुरात कोरोनाचे तब्बल ३ हजार ७९६ रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. गेल्या २४ तासांत नागपुरात २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा हा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर तयार झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या उप-राजधानीला बसलेला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये नागपुरात कोरोनाचे तब्बल ३ हजार ७९६ रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. गेल्या २४ तासांत नागपुरात २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा हा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर तयार झाला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परंतू यानंतरही रुग्णसंख्येत कमी होताना दिसत नसल्यामुळे यंत्रणांना तयार ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत. ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवेची व ऑक्सीजनची गरज आहे त्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होतील याची काळजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
नागपुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यासह विभागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये, खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
हे वाचलं का?
याचसोबत शहरात खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भात माहिती जनतेला उपलब्ध होईल. तसेच ज्या रुग्णांना तात्काळ भरती करण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेतर्फे होम आयसोलेशनतर्फे मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Exclusive : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही – डॉ. रमण गंगाखेडकर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT