हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतोय, राजेश टोपेंनी व्यक्त केली ही भीती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील कोरोनासदृष्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाउन लावण्यात येण्याबद्दल सूचक संकेत मिळत आहेत. रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्यामुळे लॉकडाउन लावण्याची वेळ आलेली असून याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं. याच बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतो आहे असं म्हणत परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

ADVERTISEMENT

Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही – उद्धव ठाकरे

“सध्या राज्यात हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतो आहे. यासाठी आपल्याला लसीकरणावर अधिक भर द्यावा लागणार आहे. राज्यातील हॉस्पिटलमध्ये ICU आणि व्हेंटिलेटर बेड्सचा विचार करुन वापर करावा लागणार आहे”, टोपेंनी माहिती दिली. विकेंड लॉकडाउन लावल्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूरमध्ये काही भागात लोकं रस्त्यावर फिरत असल्याबद्दलही टोपे यांनी नाराजी व्यक्त केली.

हे वाचलं का?

राज्यात आयसीयू, व्हेंटिलेटर्स बेड यांची अत्यंत कमतरता आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला ६ लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे. एका महिन्यात राज्याला किमान १ कोटी लसी लागतील असंही टोपे सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले. याच बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हणत संपूर्ण लॉकडाउनला विरोध केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT