Rain update : पावसाचा तडाखा! राज्यात सात जणांचा मृत्यू, कन्नड घाटात दरड कोसळली
राज्याच्या विविध भागात सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून, लातूर व यवतमाळ जिल्ह्यात जीवित हानीच्या घटनाही घडल्या आहेत. कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात सीना नदीला पूर आला आहे. पुरात अडकलेलं एक प्रवासी वाहन बाहेर काढलं असून, अहमदनगर-कल्याण वाहतूक […]
ADVERTISEMENT
राज्याच्या विविध भागात सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून, लातूर व यवतमाळ जिल्ह्यात जीवित हानीच्या घटनाही घडल्या आहेत. कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात सीना नदीला पूर आला आहे. पुरात अडकलेलं एक प्रवासी वाहन बाहेर काढलं असून, अहमदनगर-कल्याण वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
छत्तीसगड वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम महाराष्ट्रासह राज्यावर दिसून येत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.
हे वाचलं का?
लातूरमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमावर्ती भागात तुफान पाऊस झाला. पावसामुळे नदी-ओढ्याना पूर आला आहे. भालकी तालुक्यातील जामखंडी जवळचा निलंगा-भालकी रस्त्यावरचा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्याने पूल मधोमध खचला आहे. दुसऱ्या एका घटनेत निलंगा तालुक्यातील जाऊ गावात ओढ्याला आलेल्या पुरात शेतकरी वाहून गेला. जुबेर शेख असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. जुबेर शेख हे शेतीतील काम आटोपून घराकडे परतत होते. पाय घसरून ते ओढ्यात पडले आणि वाहून गेले. दोन तासांच्या शोधानंतर जुबेर यांचा मृतदेह गावकऱ्यांच्या हाती लागला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
यवतमाळमध्ये दोघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला
यवतमाळ जिल्ह्यातील नांदेपेरा-राजूर मार्गावरील सोनापूर नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले. सतीश देठे आणि बालू उईके हे दोघे मोटारसायकलवरून घरी येत होते. सोनपूर नाल्यावरील पुलावरून त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकलसह दोघेही वाहून गेले. गावकऱ्यांनी शोध सुरू केला. काही अंतररावर सतीशचा मृतदेह आढळून आला. बालूचा शोध सुरूच आहे.
कन्नड घाटात दरड कोसळली… वाहतूक वळवली…
मुसळधार पावसामुळे कन्नडच्या घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने मोठंमोठे दगड आणि चिखल रस्त्यावर आला असून, मोठा ढिगारा साचला आहे. या ढिगाऱ्यात काही वाहनंही अडकली. दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद असून, नागरिकांनी चाळीसगाव-औरंगाबाद प्रवासासाठी कन्नड-पानपोई-चापनेर-शिरूर बंगला-नांदगांव मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन महामार्ग पोलीस निरीक्षक भागवत पाटील यांनी केलं आहे.
पुरातून टेम्पो ट्रॅव्हल काढली बाहेर…
अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे.
जेऊर भागात पाऊस झाल्याने नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून नदीपलिकडील उपनगराचा नगर शहराशी संपर्क तुटला आहे. नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. कल्याण रोडवरील सीनानदीवरील पुलावर एक बस पुराच्या पाण्यात अडकली. बसमधील चालकाला स्थानिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.
नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस… पाच जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पूरपरिस्थिी निर्माण झाली आहे. लोहा तालुक्यातील सावरगावमध्ये एकाच कुटुंबातील लोक बैलगाडीने घरी जात होते. अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन बैलगाडी पुरात वाहून गेली. यातील तीन जण झाडाला धरून बसले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं. मुखेडमधील उंद्री गावात एक १५ वर्षीय विद्यार्थ्यांचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला, तर कंधारमधील गगनबीडमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीचा पुराच्या पाण्यात सापडून मृत्यू झाला.
आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा
राज्यात आज व उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि संबंधित cycir याचा प्रभाव – महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता – ३० ऑगस्ट ते 1 सप्टेंबर २०२१https://t.co/gtqwt4hLVR AND https://t.co/vu8MyJiEj1 pic.twitter.com/HdrKYdkmgB
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 30, 2021
नाशिक, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे…
पुणे, रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT