Vaccination in State : राज्यात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार जणांना दिली लस
राज्यात मंगळवारपासून १८ वर्षावरील वयोगटातील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी राज्यात आत विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. याआधी राज्यात २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी […]
ADVERTISEMENT
राज्यात मंगळवारपासून १८ वर्षावरील वयोगटातील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी राज्यात आत विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
याआधी राज्यात २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली होती. त्यावेळी संपूर्ण राज्यात ५ लाख ३४ हजार लोकांना लस दिली होती. काही महिन्यांपूर्वी लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात १८ ते ३० वयोगटातील लोकांचं लसीकरण स्थगित करण्यात आलं होतं. या विक्रमी लसीकरणाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, देशात सोमवारी एका दिवसात जगातलं विक्रमी लसीकरण झालं. रात्री अकरा वाजेपर्यंत 85 लाख व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं. देशात सोमवारी एका दिवसात 85 लाख लोकांच लसीकरण झालं. जगात एका दिवसात विक्रमी लसीकरण भारतात झालेलं असताना महाराष्ट्रात मात्र इतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेत, महाराष्ट्रात लसीकरण कमी झाल्याचं आढळलं. परंतू ही कसर भरुन काढत राज्याने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे.
हे वाचलं का?
आज महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 43 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 57 लाख 42 हजार 258 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.9 टक्के इतका झाला आहे. आज महाराष्ट्रात 8 हजार 470 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 188 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT