हिंगोली : भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

आपल्या भाचीची छेड काढल्याचा राग मनात धरत हिंगोली शहरातील एका तरुणाची गुप्ती आणि खंजीराने वार करत निर्घृण हत्या केली आहे. हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात ही घटना घडली आहे. शुभम राजे असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात काही दिवसांपूर्वी शुभम राजे आणि बबलू धाबे यांच्यात काही दिवसांपूर्वी छेडछाडीवरुन वाद झाला होता. या वादाचा राग बबलूच्या मनात होता. सोमवारी मध्यरात्री बबलू आणि त्याने अन्य दोन मित्र तलाबकट्टा भागात आले आणि त्यांनी पुन्हा एकदा शुभमला बोलावून घेतलं.

यावेळी तिघांनी पुन्हा शुभमशी वाद उकरुन काढत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत त्याला मारहाण केली. यावेळी अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शुभम जागेवरच कोसळला आणि त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

हे वाचलं का?

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी शहरात छापेमारी करत आरोपी बबलू आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. मयत शुभम राजेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT