परमबीर यांचे गंभीर आरोप, अनिल देशमुख अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटी मागितल्याचा आरोप केला. आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना पैसे कसे जमा करायचे याची आयडीयाही दिल्याचं सांगितलंय. मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि अन्य दुकानांमधून २-३ लाख गोळा केल्यास महिन्याअखेरीस १०० कोटी जमा होतात असंही देशमुख वाझेंना म्हणाल्याचं परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलंय. अनिल देशमुख यांनी परमबीर यांचे आरोप फेटाळले असून त्यांनी या प्रकरणात परमबीर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

“माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्याविरोधात केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि माझ्याविरोधात त्यांनी हे रचलेलं षडयंत्र आहे. परमबीर सिंग या प्रकरणात खोटं बोलत असून मी ते तुम्हाला काही मुद्द्यांमधून पटवून देण्याचा प्रयत्न करतो.” अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आपली बाजू मांडली.

‘मुंबईत सतराशे बार आहेत, रेस्टॉरंट आहेत; ४०-५० कोटी सहज जमू शकतात!’

हे वाचलं का?

१) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग इतके दिवस शांत का बसले होते? त्यांनी त्यावेळीच आपलं तोंड का उघडलं नाही??

२) १७ मार्चला आपल्याला पदावरुन हटवलं जाईल याची कल्पना आल्यानंतर परमबीर सिंग यांनी ACP पाटील यांच्याशी Whats App वरुन संवाद साधला आणि आपल्याला हवी तशी उत्तर मिळवली. हा त्यांनी रचलेल्या षडयंत्राचा एक भाग आहे. हे संभाषण नीट पाहिलंत तर तुम्हाला लक्षात येईल की परमबीर सिंग पद्धतशीरपणे पुरावे गोळा करत आहेत. पाटील यांच्याशी संवाद साधताना परमबीर हे किती उतावीळ झाले होते हे आपल्याला समजून येईल.

ADVERTISEMENT

३) १८ मार्चला परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा व्हॉट्सअपवर काही पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला, यानंतर १९ मार्चलाही त्यांनी असंच केलं. मी याआधीही सांगितलंय की परमबीर सिंग यांच्याविरोधात काही गंभीर आरोप होते म्हणूनच त्यांना पोलीस आयुक्त पदावरुन हटवण्यात आलं.

ADVERTISEMENT

४) पोलीस खात्यातील प्रत्येकाला माहिती आहे की ACP पाटील आणि सचिन वाझे हे परमबीर सिंग यांच्या जवळचे आहेत. १६ वर्ष निलंबीत असलेल्या सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घेतला.

परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत, त्यांनी हे आरोप सिद्ध करायला हवेत, मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी ते असे आरोप करत आहेत. जर सचिन वाझे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात भेटले असं परमबीर सिंग म्हणत असतील तर ते त्यावेळीच का बोलले नाहीत, इतके दिवस ते शांत का होते? स्फोटकांच्या प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर असे आरोप करुन परमबीर सिंग सरकारला ब्लॅकमेल करु पाहत आहेत. हिरेन आणि स्कॉर्पिओ प्रकरणात परमबीर सिंग यांनी केलेला हा कट आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.

ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग

याचसोबत मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपीची निष्पक्षपणे चौकशी करायला हवी अशीही मागणी केली आहे. दरम्यान परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप नेत्या पंकजा मुंडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनतर महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा बॅकफूटला फेकलं गेलं आहे, त्यामुळे याप्रकरणात आता सरकार काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना !

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT