उद्धव ठाकरे आणि चिराग पासवान होण्यापासून कसे वाचले नितीश कुमार?, बिहारच्या राजकारणाची इनसाइड स्टोरी

मुंबई तक

बिहारच्या राजकारणातही (Bihar Politics) महाराष्ट्रासारखी राजकीय स्क्रिप्ट लिहिली जात होती. महाराष्ट्रात शिवसेनेच्याच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत उद्धव ठाकरेंना बॅकफुटवरती टाकले. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्याद्वारे ‘शिंदे मॉडेल’ची स्क्रिप्ट लिहिली जात होती, पण जेडीयूचे राजकीय भवितव्य शिवसेनेसारखे होऊ नये, अशी तयारी नितीश कुमार यांनी अत्यंत काटेकोरपणे केली होती. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एकीकडे भाजपच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बिहारच्या राजकारणातही (Bihar Politics) महाराष्ट्रासारखी राजकीय स्क्रिप्ट लिहिली जात होती. महाराष्ट्रात शिवसेनेच्याच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत उद्धव ठाकरेंना बॅकफुटवरती टाकले. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्याद्वारे ‘शिंदे मॉडेल’ची स्क्रिप्ट लिहिली जात होती, पण जेडीयूचे राजकीय भवितव्य शिवसेनेसारखे होऊ नये, अशी तयारी नितीश कुमार यांनी अत्यंत काटेकोरपणे केली होती.

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एकीकडे भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचा विश्वास कायम ठेवला आणि दुसरीकडे आरजेडीसोबत सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु केले. नितीश यांनी आधी बंडखोर आरएसपी सिंग यांचे राजकीय स्थान संपवायला सुरुवात केली, नंतर भाजपला त्यांच्याच भाषेत पराभूत करण्याची योजना आखली. नितीश कुमार हे चिराग पासवान आणि उद्धव ठाकरे होण्यापासून कसे थोडक्यात बचावले? याती इनसाईड स्टोरी आपण पाहूयात.

नितीश कुमार यांनी भाजपला कसा शिकवला धडा?

लालू प्रसाद यादव यांच्या कथित ‘जंगलराज’च्या भीतीने विकासाचे नेते म्हणून उदयास आलेले नितीश कुमार तळागाळातील संघर्ष आणि मंडल राजकारणातून पुढे आले आहेत. नितीश कुमार भाजपसोबत मिळून सरकार चालवत होते, परंतु भाजपच्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे 2020 सालापासून बिहारमध्ये भाजपच्या नेत्यांच्या मनात एक होते की त्यांच्या जास्त जागा निवडूण येऊनही ते नितीश कुमारांच्या दबावाला बळी पडत सरकार चालवत होते.

राज्यात आपला मुख्यमंत्री असावा असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते, परंतु केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यावरुन ते शांत होते. मात्र, हळूहळू या आवाजाचे रूपांतर मोठ्या नाराजीत झाले. वेळोवेळी जेडीयू-भाजप नेत्यांमधील मतभेद वाढत गेले आणि ते बिहार विधानसभेतही दिसून आले. या बिहारमधील नाराजीच्या वातावरणातच एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्यातील भाजप नेते खडबडून जागे झाले. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखे घडवून आणण्याचा भाजपचा डाव होता परंतु नितीश कुमारांनी तो उधळून लावला.

हे वाचलं का?