न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावताच लालूंनी केलं ट्वीट; म्हणतात…
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरूंगावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दंडाही ठोठावण्यात आला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट केलं आहे. तर त्यांचे पूत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही निकालाबद्दल भाष्य केलं आहे. डोरंडा कोषागाराशी संबंधित […]
ADVERTISEMENT

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरूंगावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दंडाही ठोठावण्यात आला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट केलं आहे. तर त्यांचे पूत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही निकालाबद्दल भाष्य केलं आहे.
डोरंडा कोषागाराशी संबंधित १३९.३५ कोटी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत विशेष सीबीआय न्यायालयाने आज लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यादव यांना ५ वर्ष तुरूंगवास तसेच ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
लालूप्रसाद यादवांना आणखी 5 वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड देखील; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी (२१ फेब्रुवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लालू प्रसाद यादव यांच्यासह या प्रकरणात दोषी आढळलेल्या ३८ जणांनाही शिक्षा सुनावली असून, सीबीआय न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी निकाल आल्यानंतर सांगितलं.










