दुर्दैवी! पती-पत्नीच्या भांडणात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे

ADVERTISEMENT

पती पत्नीच्या भांडणामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. बारामतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पत्नीला राग आला. रागाच्या भरात गावाबाहेरच्या खाणीत साठलेल्या पाण्यात या महिलेने उडी घेतली. आपल्या आईने पाण्यात उडी घेतली हे पाहून तिच्या दोन मुलांनीही पाण्यात उडी घेतली. या घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. दिव्या सूर्यवंशी (वय चार) आणि शौर्य (वय दोन) अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघे आईच्या मागे मागे खाणीत साठलेल्या पाण्यापर्यंत आले होते. तिचा पतीही तिच्या मागे आला होता. त्याने पाण्यात उडी टाकून या महिलेला वाचवलं. पण दोन मुलांना वाचवता न आल्याने त्या दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. बारामतीतल्या पिंपळीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळं गाव हळहळलं आहे.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नी च्या भांडणातून रागाच्या भरात ही घटना घडली आहे. शनिवारी (दि 29) पहाटे तीन च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा.पिंपळी, ता. बारामती ) या पती पत्नी मध्ये भांडण झालें.त्यामुळे विवाहिता रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत पिंपळी येथील खाणीच्या पाण्याच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात विवाहितेने खाणीच्या पाण्यात उडी देखील मारली. मात्र याच वेळी आईला पाहण्यासाठी त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2)हे दोघे पाठोपाठ आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली.

हे वाचलं का?

या घटनेचा वेळी महिलेचा पती अतुल यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले लहान असल्याने त्यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट आज अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT