लग्नाआधी IAS टीना दाबीचे होणारे पती प्रदीप गावंडेंची बदली, पाहा कुठे मिळालं पोस्टिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जयपूर: IAS टीना दाबी आणि प्रदीप गावंडे हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, राजस्थान सरकारने नुकतेच मोठे प्रशासकीय फेरबदल करताना सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली यादीत आयएएस प्रदीप गावंडे यांचेही नाव आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार चर्चेत असलेल्या आयएएस टीना दाबी हिचे होणारे पती आयएएस प्रदीप गावंडे यांची सचिवालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी ते पुरातत्व व वस्तुसंग्रहालय (जयपूर) विभागात संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली सहसचिव, उच्च शिक्षण विभाग (जयपूर) येथे झाली आहे.

दुसरीकडे, टीना दाबी या सध्या राजस्थान वित्त विभागात सहसचिव आहेत. टीनानंतर आता तिचे भावी पती प्रदीप गावंडेही सचिवालयात आले आहेत.

हे वाचलं का?

अलीकडेच टीना आणि प्रदीप यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते मात्र प्रचंड निराश झाले आहेत. टीनाने तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले आहे तर प्रदीप गावंडे यांनी देखील त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअॅक्टिव्हेट करून सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे.

जाणून घ्या प्रदीप गावंडे यांच्याबद्दल

ADVERTISEMENT

मूळचे महाराष्ट्राचे असलेले प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली होती.

ADVERTISEMENT

प्रदीप गावंडे यांनी लातूरमधील राजश्री शाहू महाविद्यालयातून 12वीचं (विज्ञान शाखा) शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी ते औरंगाबादला आले. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून (घाटी) त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 2013 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आता ते राजस्थान केडरचे अधिकारी म्हणून सनदी सेवेत आहेत.

प्रदीप गावंडे यांना दोन भावंडं आहेत. त्यांचे मोठे बंधूही डॉक्टर आहेत. डॉ. हेमंत गावंडे हे एमबीबीएस डॉक्टर असून, सध्या ते औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. त्यांची लहान बहीणही एमबीबीएस डॉक्टर आहे. लहान बहिणचं लग्न झालं असून, बहिणीचे पतीही पेशाने डॉक्टर आहेत. गावंडे यांची छोटी बहिण मुंबईतील खासगी रुग्णालयात कार्यरत आहे.

त्यांच्या आई सत्यभामा केशवराव गावंडे या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. तर त्यांच्या वडील युनियन बँकेत अधिकारी पदावर कार्यरत होते. 2013 मध्ये गावंडे यांच्या वडिलांचं निधन झालं.

डॉ. प्रदीप गावंडे हे राजस्थानात कार्यरत असले, तरी त्यांचे बहुतांश नातेवाईक आणि मित्र पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातच राहतात. त्यामुळे ते लग्न राजस्थानात तर रिसेप्शन पुण्यात करणार आहेत. 22 एप्रिल रोजी दोघेही विवाहबद्ध होणार असून, 24 एप्रिल रोजी रिसेप्शन असणार आहे.

22 एप्रिल 2022 रोजी ते यूपीएससी टॉपर आणि आयएएस टीना दाबीसोबत लग्न करणार आहेत. टीनाचे हे दुसरे लग्न आहे. प्रदीप हे वयाने टीनापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत.

टीना दाबीने पहिले लग्न आयएएस अथर खानशी केले होते. मात्र, काही कारणांमुळे हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि नंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT