अवघ्या 15 दिवसात पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोना संसर्गांचं प्रमाण वाढतं आहे. अशात महाराष्ट्रातले सतरा जिल्हे असे आहेत जिथे सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे तो पुणे जिल्हा. पुण्यात 1 लाखांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. याच पुण्यात मागील 15 दिवसात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. हसत खेळत असलेल्या जाधव कुटुंबावर त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे अशात आता पुण्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

उस्मानाबाद- 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार;
अंतिम दर्शनासाठीची नातेवाईकांची धडपड

30 मार्चपूर्वी पुण्यातील धानोरी कुटुंबाला कल्पनाही नव्हती की त्यांच्या नशिबात काय दुर्दैवी घटना लिहून ठेवली आहे.. हसत खेळत असणारं हे कुटुंब होतं असं म्हणायची वेळ आली आहे. कारण जाधव कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. अरूण गायकवाड यांची पत्नी वैशाली जाधव, त्यांचे दोन भाऊ आणि त्यांची आई या चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

स्मशानभूमीही गहिवरली: Corona मृत्यू झालेल्या 19 मृतदेहांवर उस्मानाबादमध्ये एकाचवेळी अंत्यसंस्कार

वैशाली जाधव यांचे वडिलाचं 15 जानेवारीला निधन झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी पूजेच्या निमित्ताने जाधव कुटुंब एकत्र आलं होतं. याच कुटुंबातलं एकानंतर एकजण पॉझिटिव्ह येण्यास सुरूवात झाली. पहिल्यांदा पॉझिटिव्ह झाला तो धाकटा भाऊ रोहित जाधव. त्यापाठोपाठ घरातल्या सगळ्यांनाच कोरोनाने घेरलं. पुणे शहरातली परिस्थिती बिकट असताना पॉझिटिव्ह झालेल्या या सगळ्यांना अॅडमिट करण्याची वेळ आली तेव्हा अरूण गायकवाड यांना प्रचंड धावपळ करावी लागली. मात्र मागच्या 15 दिवसात या कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला. वैशाली अरूण गायकवाड यांचा मृत्यू 30 मार्च 2021 ला झाला. त्या 43 वर्षांच्या होत्या. त्यांना श्लोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

3 एप्रिलला रोहित शंकर जाधव म्हणजेच वैशाली यांचा भाऊ याचा मृत्यू झाला तो 38 वर्षांचा होता. त्याला बाणेरच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. शंकरच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 4 एप्रिलला अलका शंकर जाधव म्हणजेच वैशाली आणि रोहित यांची आई यांचा मृत्यू झाला. त्यांना विश्रांतवाडीच्या विनोद मेमोरियल रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

14 एप्रिलला अतुल शंकर जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांना देवयानी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकीकडे कुटुंबातील सगळेच पॉझिटिव्ह आल्याने कुणाला कोरोनातू कसं बाहेर काढता येईल यासाठीचे प्रयत्न केले जात होते. काहींना रूग्णालयात लवकर बेड उपलब्ध झाला नाही तर काहींना रेमडेसिवीर शेवटी या चारही जणांचा जीव वाचवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले. अरूण गायकवाड यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या सगळ्यांचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. आता कुटुंबात उरले आहेत फक्त अतुल आणि रोहित यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं आणि गायकवाड कुटुंब या सगळ्यापुढेच आता कसं जगायचं हा प्रश्न आ वासून उभा आहे. कोरोनाने ही वेळ या कुटुंबावर आणली ती नक्कीच हृदय पिळवटून टाकणारी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT