अमरावतीत ७ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीवर दोनदा बलात्कार, नराधमाला अटक
धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती अमरावतीतल्या रहिमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षांच्या चिमुकलीवर २५ वर्षीय नराधमाने दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय तेलगोटे असं या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने दोनवेळा सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या घरातल्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अजय तेलगोटेला अटक केली आहे. अजय […]
ADVERTISEMENT
धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती
ADVERTISEMENT
अमरावतीतल्या रहिमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षांच्या चिमुकलीवर २५ वर्षीय नराधमाने दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय तेलगोटे असं या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने दोनवेळा सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या घरातल्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अजय तेलगोटेला अटक केली आहे.
अजय नावाच्या नराधमाने या सात वर्षांच्या चिमुरडीला घराच्या शेजारी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या नराधमाला अटक केली आहे. यासंदर्भातला पुढील तपास रहिमपूर पोलीस करत आहेत.
हे वाचलं का?
अजय नावाचा हा तरूण या मुलीला फिरायला घेऊन जात असे. पीडित मुलीचे आई वडीलही त्याला व्यवस्थित ओळखत होते. कधी शेतात किंवा गावात या मुलीला तो फिरायला घेऊन जात असे. अशात तो तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला आणि तिच्यावर दोनदा बलात्कार केला. हा सगळा प्रकार पीडित मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितला. ज्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून या अजय नावाच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Crime: 15 वर्षीय मुलीवर ‘निर्भया’सारखा पाशवी बलात्कार, गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव; पीडिता ICU मध्ये
ADVERTISEMENT
2021 मध्येही घडली होती अशीच घटना
2021 मध्येही रहीमपूर पोलीस ठाम्याच्या हद्दीत वनोजा या गावात राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. तो तरून तिच्या गावातलाच होता. या मुलीचं कुटुंब शेतमजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात गेलं होतं. त्यांनी त्याच्या सात वर्षांच्या मुलीला आजोबा-आजीकडे ठेवलं होतं. त्यावेळी तिच्याच गावात राहणाऱ्या शिवम नावाच्या २० वर्षांच्या तरूणाने तिच्यावर बलात्कार केला. या मुलीने जेव्हा रडत सगळी माहिती आपल्या आई वडिलांना दिली तेव्हा ती घटना उघडकीस आली होती. आता पुन्हा एकदा अमरावतीत अशीच घटना घडली आहे. पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT