औरंगाबादमध्ये 29 वर्षीय विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबादमध्ये एका २९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या रांजणगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे. गुरूवारी दुपारी ही घटना घडली आहे. शीला रामदास कोंडके असं आत्महत्या केलेल्या 29 वर्षीय महिलेचं नाव आहे. शीला कोंडके या फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील रहिवासी होत्या. गुरूवारी दुपारी 2 च्या सुमारा शीला यांनी त्यांच्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शीला यांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून शीला यांना मृत घोषित केलं.

शीला कोंडके यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण 29 वर्षीय विवाहितेनं असं अचानक आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती वडोदबाजार पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शीला यांच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पवार करत आहेत.

हे वाचलं का?

दुसऱ्या एका घटनेत, पुण्याजवळ असणाऱ्या पिंपरी शहरात एका तरुणानं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. बायको, सासू, मेहुणा, मेहुणी आणि साडू यांच्या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेतला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यानं मृत्यूचं कारण लिहिलं असून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची नावं लिहिली आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT