Kolhapur Flood: थरारक.. पुराच्या पाण्यात अडकली बस, मध्यरात्री जवानांनी वाचवले तब्बल 25 प्रवाशांचे प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे अक्षरशः दैना उडाली आहे. यामुळे अनेक कोल्हापूरसह नजीकच्या अनेक जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे. अशात 22 जुलैच्या मध्यरात्री एक बस पुराच्या पाण्यात अडकली होती. ज्यानंतर त्यात अडकलेल्या तब्बल 25 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मध्यरात्री सुरु झालेला हा संपूर्ण थरार 23 जुलैच्या पहाटे संपला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची 54 सीटर बस राजपूतवाडी जवळ पाण्यात अचानक अडकली. पाण्याचा अंदाज न आल्याने बस पुढे गेल्याने थेट पाण्यात जाऊन अडकली. यावेळी संपूर्ण बसमध्ये पाणी शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, यावेळी बसमध्ये 8 पुरुष, 8 महिला व 6 लहान मुले असे एकूण 25 प्रवासी होते. पन्हाळा मार्गावरुन जात असताना आंबेवाडी येथे पाणी असलेल्या ठिकाणावरुन बस पुढे जात होती. मात्र मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा वेग आणि खोली अचानक वाढली. यावेळी बस पुढे घालणं हे धोक्याचं ठरलं असतं त्यामुळे बस चालकाने प्रसंगावधान राखत बस तिथेच थांबवली.

यानंतर बस चालकाने गाडी अडकल्याचा संदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास तात्काळ कळवला. हा संदेश मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान आंबेवाडी येथे पोहचले. यानंतर 2 जवानांनी मोठ्या शर्थीने पाण्यातून मार्ग काढत बसपर्यंतचा पल्ला गाठला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

जवान सिध्दार्थ पाटील व शुभम काटकर यांनी प्रचंड वेग असलेल्या पाण्यातून बसपर्यंत मजल मारली. बसमध्ये पोहचताच त्यांनी सर्वात आधी बसमधील प्रवाशांना धीर दिला.

यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख सुनील कांबळे यांच्यासोबत अजित शिंदे, रोहित कांबळे, सोमनाथ लोहार, शिवा गडकरी हे बोट घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

Maharashtra Rains 2021: महाराष्ट्रात पावसाचा धूमाकूळ, मुंबई-पुण्यासह राज्यातील पावसाचे सर्व अपडेट

त्यानंतर याच बोटीतून जवानांनी बचावकार्य सुरु केलं. सुरुवातीला त्यांनी महिला व मुलांना सुखरुप परत आणलं. त्यानंतर इतर लोकांना आणि बस चालक आणि वाहक यांचीही सुखरुप सुटका केली. दरम्यान, हे संपूर्ण बचावकार्यं चार तासांहून अधिक काळ सुरु होतं.

या संपूर्ण बचाव कार्यानंतर प्रवाशांनी आणि बसच्या चालक आणि वाहकाने आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांचे आभार मानले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT