हुश्श! विघ्न टळलं… टीम इंडिया कोरोना निगेटिव्ह; आजपासून पाचवी कसोटी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षण रवि शास्त्री यांच्यासह संघाच्या स्टाफमधील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं पाचव्या कसोटी सामन्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पाचवा कसोटी सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे आजपासून सुरू होणार आहे. (IND vs ENG 5th test)

ADVERTISEMENT

भारत व इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. दोन सामने जिंकून भारत २-१ असा आघाडीवर आहे. मात्र, पाचव्या कसोटी सामन्या आधीच भारतीय संघाच्या स्टाफमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानं पाचव्या कसोटी सामन्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती.

टीम इंडियातील सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सर्व खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट असून, गुरुवारी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.

हे वाचलं का?

Breaking News : टीम इंडियाचे प्रशिक्षक Ravi Shastri यांना कोरोनाची लागण

भारताचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे बुधवारी संध्याकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. परमार यांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना विलगीकरणा ठेवण्यात आलं होतं. सर्व खेळाडू त्यांच्या खोल्यांमध्ये बंद होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंच्या दोन RT-PCR चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट समोर आले असून, सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.

ADVERTISEMENT

परमार यांना कोरोना संसर्ग होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिजिओ नितीन पटेल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. ओव्हलमध्ये झालेल्या कसोटी सामन्याच्या दरम्यान रवि शास्त्री एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती.

ADVERTISEMENT

T-20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, रविचंद्रन आश्विन-भुवनेश्वर संघात परतले

भारतीय संघाच्या स्टाफमधील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटी सामना होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल साशंकता व्यक्त केली होती. कसोटी सामना होईल की नाही, याबद्दल आताच सांगू शकत नाही. सामना होईल अशी आशा आहे, असं सौरव गांगुलीनं कोलकात्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT