INS करंज नौदलाच्या ताफ्यात दाखल, भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं
भारतीय नौदलासाठी आजचा दिवस अतियश महत्वाचा ठरला आहे. स्कॉर्पिन श्रेणीमधली तिसरी पाणबुडी INS Karanj आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. मुंबईतील नेवल डॉकयार्डमध्ये झालेल्या छोटेखानी सोहळ्यात ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. हिंदी महासागरात चीन आणि भारत यांना टक्कर देण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखी वाढवणार आहे. करंज पाणबुडीची सर्वात […]
ADVERTISEMENT
भारतीय नौदलासाठी आजचा दिवस अतियश महत्वाचा ठरला आहे. स्कॉर्पिन श्रेणीमधली तिसरी पाणबुडी INS Karanj आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. मुंबईतील नेवल डॉकयार्डमध्ये झालेल्या छोटेखानी सोहळ्यात ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. हिंदी महासागरात चीन आणि भारत यांना टक्कर देण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखी वाढवणार आहे.
ADVERTISEMENT
करंज पाणबुडीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी आहे. याआधी स्कॉर्पिन श्रेणीतल्या आयएनएस कलवरी, खंदेरी या पाणबुड्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाल्या आहेत. परंतू या पाणबुडी फ्रान्सच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आल्या आहेत. परंतू INS करंज ही संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी असल्यामुळे संरक्षण क्षेत्रात ही गोष्ट भारतीय नौदलासाठी मैलाचा दगड मानली जात आहे.
हे वाचलं का?
करंज ही पाणबुडी रडारच्या कक्षेत येऊन शकत नाही अशा पद्धतीने याची बांधणी झाली आहे. जमिनीवर हल्ला करण्यासोबतच ही पाणबुडी समुद्राखाली जास्तीत जास्त काळ राहू शकते. आयएनएस करंज मुळे भारतीय नौदलात पाणबुड्यांची संख्या आता १८ वर आली आहे. काय आहेत या पाणबुडीची वैशिष्ट्य पाहूयात…
१) मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत करंज ही पाणबुडी संपूर्णपणे भारतामध्ये बनवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
२) अत्याधुनि तंत्रज्ञान, जमिनीवर आणि पाण्याखाली शत्रूचा अचूक वेध घेण्याची क्षमता…याचसोबत अत्यंत कमी आवाजामुळे ही पाणबुडी शत्रुला चकवू शकते.
ADVERTISEMENT
३) १८ टॉर्पिडो आणि जहाजभेदी शस्त्रांनी सज्ज
४) पाण्याखाली जास्तीत जास्त राहता यावं यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मीतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
५) ३९ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT