INS Vikrant प्रकरणी किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत बोट प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या कारण सत्र न्यायालयाने आधी किरीट सोमय्या आणि त्यानंतर नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.

Kirit Somaiya INS Vikrant: किरीट सोमय्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

हायकोर्टाने किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. किरीट सोमय्यांनी आधी सत्र न्यायालयात आणि त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आणि बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. गुरूवारपासून सलग सुट्ट्यांमुळे याचिका आजच (बुधवार) सुनावणीसाठी यावी यासाठी किरीट सोमय्यांच्या वकिलांकडून प्रयत्न केले जात होते. अखेर आज यावर सुनावणी झाली असून हायकोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देत असताना तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली आहे असं निरीक्षणही नोंदवलं आहे. असं असलं तरीही किरीट सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर रहावं लागेल असंही कोर्टाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

१८ एप्रिल पासून पुढचे चार दिवस सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसंच अटक झाली तर ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

ADVERTISEMENT

भर पत्रकार परिषदेत जोडा काढत किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत तुम्ही खुशाल….

काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत वाचवा म्हणत एक मोहीम राबवली होती. या मोहिमेत त्यांनी निधी गोळा केला होता. मात्र हा निधी राज्यपाल कार्यालयात पोहचला नाही. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली. राजभवनाने दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली. या प्रकरणी माजी सैनिक भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार यांच्याविरूद्ध अर्ज केला. INS विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी कोट्यवधींचा आरोप सोमय्यांवर आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली निधी गोळा केला होता. 57 ते 58 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, तो निधी राजभवनाकडे जमा केला गेलाच नाही, असं सांगत राऊतांनी सोमैय्यांच्या कंपनीत हा पैसा वापर गेलाय का? असा सवाल केला होता.

‘आपण यांना पाहिलंत का?’; किरीट सोमय्यांचे ठाण्यात झळकले बॅनर्स

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, ‘विक्रांत वाचवा म्हणून ते डबे फिरवायला लागले. त्या काळात त्यांना महाराष्ट्रातील लाखो करोडो लोकांनी पैसे दिले. माझ्या माहितीप्रमाणे किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले होते. ही रक्कम 57 ते 58 कोटी रुपये होती. मला हे त्यांच्याच एका जवळच्या माणसाने सांगितलं.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT