IPL आयोजनाबद्दल BCCI ने माफी मागावी – हायकोर्टात याचिका दाखल

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सनराईजर्स हैदराबादचा खेळाडू वृद्धीमान साहाला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने तात्काळ यंदाची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करणं गरजेचं होतं का असा प्रश्न विचारला जात होता. आयपीएल स्थगित करण्यात आलं असलं तरीही बीसीसीआयसमोरील अडचणी काहीकेल्या कमी होत नाहीयेत. मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट वंदना शहा यांनी याचिका दाखल करत, आयपीएलचं आयोजन केल्याप्रकरणी बीसीसीआयने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

वंदना शहा यांनी आपल्या याचिकेत बीसीसीआयने सध्याच्या खडतर काळात १ हजार कोटींची मदत आरोग्य व्यवस्थेला करण्याची मागणी केली आहे. सध्या देशातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे, बीसीसीआयने यात पुढाकार घ्यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. देश कोरोनाशी लढत असताना आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करणं म्हणजे बीसीसीआयचं उद्दामपणाचं लक्षण आहे. मी स्वतः क्रिकेटची फॅन आहे, परंतू सध्याच्या घडीला खेळापेक्षा लोकांचा जीव अधिक महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रीया याचिकाकर्त्या वंदना शहा यांनी दिली. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित केली असली तरीही आपली याचिका सुनावणीसाठी यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं वंदना शहा यांनी सांगितलं. स्पर्धा रद्द झाल्याची अधिकृत माहिती देताना बीसीसीआयने, “खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतर सदस्यांची तब्येत चांगली राहणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता खेळाडूंचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी बीसीसीआयने यंदाचे आयपीएलचे सामने तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात खडतर काळ असताना आम्ही लोकांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे आणायचा प्रयत्न केला, परंतू सध्याची परिस्थिती पाहता सामने स्थगित करणं हाच योग्य पर्याय दिसतो आहे. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांच्या घरी सुखरुप पोहचतील याची आम्ही काळजी घेऊ”, अशी माहिती दिली.

हे वाचलं का?

IPL 2021 : Bio Secure Bubble म्हणजे नक्की काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT