यासीन मलिकला जन्मठेप सुनावल्यानंतर श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद, तणाव टाळण्यासाठी बंदोबस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यासीन मलिकला दिल्लीच्या NIA कोर्टाने जन्मठेपेची सुनावली आहे. यानंतर श्रीनगरमध्ये समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यासीन मलिकच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या तसंच गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केला. श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

त्याआधी पोलिसांनी यासिनच्या घराच्या बाहेर सुरक्षा वाढवली आहे. ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष ठेवलं जातं आहे. श्रीनगरच्या मैसूमा भागात यासीन मलिकचं घर आहे. त्याच्या घराबाहेरही निदर्शनं केली जात आहेत.

हे वाचलं का?

दहशतवादी कारवायांसाठी जगभरात जाळं तयार करून निधी गोळ्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने यासीन मलिकला शिक्षा ठोठावली आहे. दुपारी ३.३० वाजता यासीन मलिकला शिक्षा सुनावली जाणार होती. त्यानंतर हा निर्णय ४ वाजेपर्यंत टाळण्यात आला होता.

त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता न्यायालयाने यासीन मलिकला शिक्षा सुनावली. दोन प्रकरणात आजन्म कारावास आणि १० लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

दिल्लीतील एनआयए न्यायालयाने युक्तीवाद संपल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. न्यायालयात सुनावणी दरम्यान एनआयएने यासीन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

ADVERTISEMENT

यासीन मलिकवर दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या नावाखाली यासीन मलिकने दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी नेटवर्क निर्माण केल्याचं न्यायालयाने मान्य केलं.

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत ३० मे २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एक डझनपेक्षा अधिक लोकांविरुद्ध १८ जानेवारी २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

एनआयए न्यायालयात सांगितलं होतं की, लश्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जेकेएलएफ, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने कश्मीर खोऱ्यात नागरिक आणि सुरक्षा जवानांवर हल्ले केले. मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT