कल्याण: ‘मला ‘भाई’ का बोलला नाहीस?’, किरकोळ वादातून तरुणावर थेट चॉपरने वार
मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यातच फक्त आपल्याला ‘भाई’ न बोलता एकेरी उल्लेख केल्याचा राग मनात धरुन एका तरुणाला मारहाण तर त्याच्या भावावर थेट चॉपरने हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे. नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय भालेराव नावाच तरुण हा […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यातच फक्त आपल्याला ‘भाई’ न बोलता एकेरी उल्लेख केल्याचा राग मनात धरुन एका तरुणाला मारहाण तर त्याच्या भावावर थेट चॉपरने हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय भालेराव नावाच तरुण हा आपल्या काही मित्रांसह शनिवारी (11 डिसेंबर) रात्री एका ढाब्यावर पार्टीसाठी गेले होते. यावेळी मित्रामित्रांमध्ये काही कारणावरुन वाद सुरु झाले. यावेळी अक्षय भालेराव याने वाद वाढू नये यासाठी आपल्या मित्रांना सोडविण्याचा प्रयत्न केला.
हे वाचलं का?
यावेळी त्याच ठिकाणी विजय शिंदे आणि रवी वाघे नावाचे दोन तरुण उभे होते. आपल्यातील वादात हे दोघे जण पडू नयेत यासाठी अक्षयने आपल्या मित्राला बाजूला नेलं. यावेळी अक्षय भालेराव याने आपल्या बाजूला विजय उभा आहे. असं आपल्याला मित्राला सांगत बाजूला नेलं.
आपल्यातील वादात इतर जण पडू नयेत यासाठी अक्षयने सगळ्यांन बाजूला नेलं. मात्र, आपला एकेरी उल्लेख केल्याने आणि ‘भाई’ न बोलल्याचा राग धरुन विजयने रविवारी अक्षय भालेराव याला अडवलं.
ADVERTISEMENT
यावेळी विजयने अक्षयला दमदाटी करण्यास सुरुवात केली. ‘मला तू भाई का बोलला नाहीस?’ असा सवाल करत विजय आणि त्याच्या मित्राने अक्षयला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अक्षयने फोन करुन आपल्या भावाला विशाल भालेराव याला बोलवून घेतलं.
ADVERTISEMENT
फोनवरील संपूर्ण प्रकार ऐकून विशाल हा देखील तात्काळ त्या ठिकाणी आला. जेव्हा विशाल त्या ठिकाणी आला तेव्हा त्याची देखील विजयशी बाचाबाची झाली. यावेळी विजय आणि त्याच्या साथीदारांनी थेट विशाल भालेराव याच्यावर चॉपरने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी विशालच्या पोटावर आणि पाठीवर अनेक वार करण्यात आले.
दरम्यान, यामध्ये विशाल गंभीररित्या जखमी झाला. मात्र, त्याला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला. अखेर या प्रकरणी अक्षय भालेराव याच्या तक्रारीनंतर बाजारपेठ पोलिसांनी विजय शिंदे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
किरकोळ कारणावरुन दोन युवकांची हत्या, दौंड परिसरातील धक्कादायक घटना
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यासाठी एक टीम बनवली. ज्यांनी अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली. तर सध्या या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT