काँग्रेसला मोठा झटका! कपिल सिब्बल सपाच्या पाठिंब्यावर लढवणार राज्यसभेची निवडणूक
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि जी-२३ (G-23) गटाचे वरच्या फळीतील नेते कपिल सिब्बल (Kapil sibal) यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला राम राम करत राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) पाठिंबा दिला आहे. आज काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला. माजी […]
ADVERTISEMENT
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि जी-२३ (G-23) गटाचे वरच्या फळीतील नेते कपिल सिब्बल (Kapil sibal) यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला राम राम करत राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) पाठिंबा दिला आहे.
ADVERTISEMENT
आज काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला. माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. काँग्रेसचा हात सोडल्यानंतर सिब्बल समाजवादी पक्षाच्या जवळ गेले असून, त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
…हे काँग्रेसचं दुर्दैव; कपिल सिब्बलांनी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात घातलं अंजन
हे वाचलं का?
१६ मे रोजीच दिला काँग्रेसचा राजीनामा
माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज (२५ मे) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली.
ADVERTISEMENT
कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
ADVERTISEMENT
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, ‘मी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मी अखिलेश यादव यांचा आभारी आहे. त्यांनी मला पाठिंबा दिला. मी आझम खान यांचेही आभार मानतो,’ असं सिब्बल म्हणाले.
मैंने निर्दलीय उम्मीदवार के रूप में राज्यसभा के लिए नामांकन भरा है। मैं अखिलेश यादव का आभारी हूं कि उन्होंने मेरा समर्थन किया। मैं आजम ख़ान के प्रति भी आभार प्रकट करता हूं: समाजवादी पार्टी के समर्थन से राज्यसभा का नामांकन भरने के बाद कपिल सिब्बल pic.twitter.com/E37cHvsnNn
— ANI_HindiNews (@AHindinews) May 25, 2022
Kapil Sibbal यांच्या घरासमोर युथ काँग्रेसचा राडा, शशी थरूर म्हणाले हे लज्जास्पद
२०१६ मध्ये कपिल सिब्बल तेव्हा सरकारमध्ये असलेल्या समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभेत निवडून गेले होते.
कपिल सिब्बल जर समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेत निवडून गेले, तर अखिलेश यादव यांच्यासाठी आझम खान यांची नाराजी दूर करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. त्याचंबरोबर समाजवादी पार्टीला एक मोठा नेता आणि कायदेशीर सल्लागारही मिळेल, असं बोललं जात आहे.
Kapil Sibbal’s Dinner Party: गांधी परिवाराला वगळून विरोधकांची बैठक, Sharad Pawar यांचीही उपस्थिती
कपिल सिब्बल उत्तर प्रदेशातून राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेचे एकूण ४०३ आमदार आहेत. यापैकी २ जागा रिक्त आहेत. त्यामुळे ४०१ आमदारांचंच मतदान आहे. त्यामुळे एका जागेसाठी ३६ आमदाराचं मत लागणार आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे २७३ आमदार आहेत. या संख्येनुसार भाजपला राज्यसभेच्या ७ जागा सहज जिंकता येणार आहेत. दुसरीकडे समाजवादी पार्टीकडे १२५ आमदार आहेत. त्यामुळे सपाला ३ जागा जिंकण्यात कोणतीही अडचण नाही.
असं असलं तरी राज्यसभेच्या ११व्या जागेसाठी समाजवादी पार्टी आणि भाजपत घमासान बघायला मिळणार आहे. त्यामुळे समाजवादी पार्टी आणि भाजप राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार उतरवते हे बघावं लागणार आहे. त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT