अफगाणिस्तान आणि Bollywood चं आहे जवळचं नातं, ही यादी पाहून तुम्हालाही विश्वास बसेल !
तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे लागलं आहे. जुलूमी आणि रक्तरंजीत राजवटीचा इतिहास असलेल्या तालिबानच्या अखत्यारीत अफगाणिस्तानात यापुढे कशी परिस्थिती असेल याबद्दल सध्या सर्वच स्तरात चर्चा सुरु आहे. तालिबानच्या प्रतिनिधींनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या जगासमोर ठेवल्या. सध्या अनेक अफगणी नागरिक तालिबानच्या राजवटीत रहायला लागू नये यासाठी […]
ADVERTISEMENT
तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे लागलं आहे. जुलूमी आणि रक्तरंजीत राजवटीचा इतिहास असलेल्या तालिबानच्या अखत्यारीत अफगाणिस्तानात यापुढे कशी परिस्थिती असेल याबद्दल सध्या सर्वच स्तरात चर्चा सुरु आहे. तालिबानच्या प्रतिनिधींनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या जगासमोर ठेवल्या.
ADVERTISEMENT
सध्या अनेक अफगणी नागरिक तालिबानच्या राजवटीत रहायला लागू नये यासाठी मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी भारतातून प्रार्थना केली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातलं नातं हे जुनं आहे. काही वर्षांपूर्वी आलेलं अफगाण जिलेबी हे गाणं सर्वांना चांगलंच परिचीत असेल. त्याआधीही अफगाणिस्तानने अनेक सेलिब्रेटी बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडमध्ये नाव कमावणारे काही महत्वाचे सेलिब्रेटी हे मुळचे अफगाणिस्तानचे आहेत.
Operation airlift Kabul IAF:’ते’ 120 लोकं काबूलहून भारतात कसे पोहचले?, थरारक Inside Story
हे वाचलं का?
१) सलीम खान – शोले सारखा अजरामर सिनेमा लिहीणारे सलीम खान हे बॉलिवूडमधलं मोठं नाव. जुन्या काळात सलीम-जावेद यांची जोडी चांगलीच गाजलेली होती. सर्वसामान्य लोकांच्या मनात वर्षानूवर्ष घर करुन राहतील असं लिखाण ही सलीम खान आणि जावेद यांची खासियत होती. सलीम खान यांचं मूळ अफगाणिस्तानातलं. सलीम खान यांच्या वडीलांनी व्यापारानिमीत्त भारताची वाट धरली. यानंतर खान कुटुंब भारतातच स्थायिक झालं. सलीम खान यांचा मुलगा सलमान खान इंडस्ट्रीतला आघाडीचा आणि सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
२) कादर खान – विनोदी अभिनेते आणि उत्तम पटकथा कार म्हणून कादर खान हे बॉलिवूडला परिचीत आहेत. नव्वदीच्या दशकात कादर खान आणि गोविंदा यांची जोडी अभिनयात चांगलीच गाजली. मुक्कदर का सिकंदर, कुली, कुली नंबर वन, हम, बाप नंबरी बेटा दस नंबरी, तकदीरवाला या गाजलेल्या चित्रपटांची पटकथा कादर खान यांनी लिहीली आहे.
ADVERTISEMENT
कादर खान हे मुळचे अफगाणिस्तानातल्या कंदहारचे. अनेक संकट आणि खडतर परिस्थितीचा सामना करत कादर खान मुंबईत आले आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव निर्माण केलं. आपल्या विनोदी अभिनयाने कादर खान यांनी अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
ADVERTISEMENT
३) फिरोज खान – अभिनेते फिरोज खान हे मुळचे पठाण आहेत. आजही जुन्या चित्रपटांची आवड असणाऱ्या अनेकांसाठी फिरोज खान हे त्यांचे सर्वात आवडते आणि स्टायलिश अभिनेते आहेत. अनेक चित्रपटांमधून त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं. फिरोज खान यांचं कुटुंबही मूळचं अफगाणिस्तानातलंच.
याचसोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांचं शुटींगही अफगाणिस्तानात झालं आहे. पाहूया यातील काही प्रमुख चित्रपटांची यादी –
Taliban First PC : काय असेल तालिबानचं रूप? महिला, विदेशी याबाबत काय भाष्य करण्यात आलं?
१) धर्मात्मा – १९७५ साली फिरोज खान यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या धर्मात्मा सिनेमाचं शुटींग अफगाणिस्तानात झालं होतं. यात फिरोज खान यांच्यासह हेमा मालिनी, रेखा, प्रेमनाथ, इम्तियाज खान, डॅनी, फरीदा जलाल या दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं.
२) खुदा गवाह – अमिताभ बच्चन यांची मूळ भूमिका असलेला खुदा गवाह हा चित्रपट १९९१ मध्ये अफगाणिस्तानात चित्रीत करण्यात आला. या चित्रपटासाठी तत्कालीन अफगाणिस्तान सरकारच्या वायुदलाने अमिताभ यांना १८ दिवसांसाठी संरक्षण दिलं होतं. मुकुल आनंद यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाचं चित्रीकरण अफगाणिस्तानातील काबुल, मझार-ए-शरिफ, नेपाळ आणि भारतात झालं होतं.
Amrullah Saleh अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष, स्वतःच केली घोषणा
३) जानशिन – फिरोज खान यांनी आपल्या मुलासाठी दिग्दर्शित केलेल्या जानशिन या चित्रपटाचा काही भाग अफगाणिस्तानात चित्रीत झाला होता. यात फरदीन खानसोबत सेलिना जेटलीची मुख्य भूमिका होती.
४) काबुल एक्सप्रेस – २००६ साली दिग्दर्शक कबीर खानचा काबुल एक्सप्रेस हा सिनेमाही अफगाणिस्तानात चित्रीत करण्यात आला. या चित्रपटात जॉन अब्रामह, अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
५) तोरबाज – काबुल दुतावासात काम करत असताना आपल्या पत्नी आणि मुलाला गमावल्यानंतर संजय दत्त तिकडे राहून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न कसा करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. काही महिन्यांपूर्वी आलेला हा चित्रपट गिरीश मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT