कोल्हापूर: माजी मंत्र्याच्या नातवाने चुलत्यांच्या घरावर 6 गोळ्या झाडल्या, स्वत:चा Video ही केला शूट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: गाडीतून उतरला अ्न थेट हातात असलेल्या बंदुकीतून तब्बल 6 गोळ्या समोर झाडल्या.. आता तुम्हाला वाटेल की, हा एखाद्या सिनेमातील सीन आहे का… तर तसं अजिबात नाही. ही खरीखुरी घटना दुसऱ्या एखाद्या राज्यातही नव्हे तर महाराष्ट्रातील कोल्हापुरात घडली आहे. तसंच हा गोळीबार करणारा आरोपी देखील दिवंगत माजी मंत्र्याचा नातू असल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून दिवंगत माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचा नातू मानसिंग बोंद्रे याने राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

सुरुवातीला याबाबत तक्रार देण्यासाठी कोणीच पुढं येत नव्हतं. अखेर मानसिंग बोंद्रे याचा चुलत सावत्र भाऊ अभिषेक बोंद्रे याने जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिल्यानं मंगळवारी पहाटे मानसिंग बोंद्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणी राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी आरोपी मानसिंग बोंद्रे याचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

कोल्हापुरातील अंबाई टँक परिसरात बोंद्रे कुटुंबीय राहतात. या कुटुंबातील विजय बोंद्रे यांचा मुलगा मानसिंग बोंद्रे हा शिक्षण संस्था आणि इतर मालमत्तांचा कारभार पाहतो. दसरा चौकातील श्री शहाजी महाविद्यालय या शिक्षण संस्थेसह इतर मालमत्तेबाबत मानसिंग बोंद्रे आणि गोकुळचे माजी संचालक स्वर्गीय चंद्रकांत बोंद्रे यांचे चिरंजीव अभिषेक बोंद्रे यांच्यात वाद आहे.

ADVERTISEMENT

यातूनच त्यांच्यात वादावादीचे प्रसंग घडतात. काही महिन्यांपूर्वी याच वादातून मानसिंग बोंद्रे यांन राहत्या घराच्या परिसरात स्वतःच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. त्याने चुलत भाऊ आणि चुलतीवर दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलं होतं.

ADVERTISEMENT

त्या वेळी राजकीय सूत्र फिरल्याने मानसिंग बोंद्रे हा वाचला असल्याची चर्चा होता. तरीदेखील मानसिंग याच्या वर्तणुकीत काही फरक पडला नाही. सोमवारी (13 डिसेंबर) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मानसिंग बोंद्रे याने अगदी सिनेमातील एखाद्या सीनप्रमाणे सिगरेटचा झुरका ओढत आपल्याजवळील पिस्तुल काढलं आणि त्या पिस्तुलातून कंपाउंडवर थेट 6 गोळ्या झाडल्या.

अचानक झालेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे परिसरात भीतीच सावट पसरलं. याबाबत तक्रार देण्यास कोणीच पुढ आल नव्हतं. गोळीबार करताना मानसिंग याने आपला चुलत सावत्र भाऊ अभिषेक बोंद्रे याला आणि त्यांच्या खानदानला संपविण्याची धमकीही दिली.

एवढंच नव्हे तर मानसिंग बोंद्रे स्वत:च गोळीबार करतानाचा व्हिडिओ आपल्या एका साथीदाराला घ्यायला लावला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी हा सोशल मीडियावर देखील व्हायरल केला.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक संदीप जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

Palghar Firing: चिकन सेंटरच्या मालकावर भर वस्तीत गोळीबार, CCTV मध्ये संपूर्ण थरार कैद

मात्र तोवर मानसिंग बोंद्रे हा पसार झाला होता. राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्याला अटक करण्यात येणार असल्याचं आणि त्याच्याकडील पिस्तुलाचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणार असल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT