कोल्हापूर पोटनिवडणूक : भाजपने उमेदवाराची केली घोषणा, माजी नगरसेवकाला उतरवलं मैदानात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्यामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपने आज आपला उमेदवार जाहीर केला आहे.

ADVERTISEMENT

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्यजीत कदम यांच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती आजच दिली होती. त्यानंतर रात्री भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

कोल्हापूर उत्तरसह पश्चिम बंगाल, बिहारमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या नावांचीही घोषणा भाजकडून करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र भाजपकडून पक्षश्रेष्ठीकडे माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि महेश जाधव यांची नावं पाठवण्यात आली होती. यात प्रदेश भाजपनं सत्यजित कदम यांच्या नावाला प्रथम पसंती दिलेली होती. त्यामुळे भाजपने कदम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं.

‘प्रचाराचा पंढरपूर पॅटर्न आता कोल्हापुरात’; चंद्रकांत पाटलांनी सांगितली भाजपची रणनिती

ADVERTISEMENT

उमेदवारी जाहीर होण्याआधी कदम काय म्हणाले होते?

ADVERTISEMENT

“भाजपकडून या पोटनिवडणुकीत मिळालेल्या संधीचं आपण सोनं करून दाखवू. पक्षानं दाखवलेला विश्वासही सार्थ ठरवू ,” असा विश्वास सत्यजित कदम यांनी नावाची शिफारस केल्यानंतर व्यक्त केला होता.

काँग्रेसने भाजपचा प्रस्ताव फेटाळला?

“दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना भाजपकडून ही निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी नकार दिला आहे. भाजपकडून त्यांनी ही निवडणूक लढवावी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा देऊन त्यांना बिनविरोध विजयी करावं, असा प्रस्ताव भाजपनं दिला होता. तो अमान्य करण्यात आला”, असं चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात बोलताना सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT