लातूर: सासऱ्याने केला जावयाचा खून; नंतर स्वतःच्याच लॉजमध्ये गळफास लावून केली आत्महत्या
सुनील कांबळे, लातूर: लातूरमध्ये मंगळवारी (14 डिसेंबर) सकाळी एका सासऱ्याने आपल्या जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सासऱ्याने थेट जावयाला रॉडने मारहाण केली. ज्यामध्ये जावयाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही बाब लक्षात येताच सासऱ्याने स्वतः लॉजचा तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लातूरमधील आंबुलगा येथील 45 वर्षीय शिवाजी दगडू […]
ADVERTISEMENT
सुनील कांबळे, लातूर: लातूरमध्ये मंगळवारी (14 डिसेंबर) सकाळी एका सासऱ्याने आपल्या जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सासऱ्याने थेट जावयाला रॉडने मारहाण केली. ज्यामध्ये जावयाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही बाब लक्षात येताच सासऱ्याने स्वतः लॉजचा तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT
लातूरमधील आंबुलगा येथील 45 वर्षीय शिवाजी दगडू शिंदे यांनी लातूर शहरातील नवीन रेणापूर नाक्याजवळ साईधाम नावाचे लॉज चालविण्यासाठी घेतले होते. शिवाजी शिंदे याच्या भावाच्या मुलीचा कातपूर येथील 37 वर्षीय उमेश देशमुख याच्याशी विवाह झाला होता.
मात्र, उमेश देशमुख हा सतत त्याचा पत्नीला त्रास देत होता. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. अखेर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शिवाजी शिंदे याने आपला जावई उमेश देशमुख याला रात्री आपल्या लॉजवर बोलावून घेतलं.
हे वाचलं का?
आपल्या पुतणीला त्रास देऊ नये यासाठी शिवाजी शिंदे हे जावयाची समजूत काढत होते. पण याच गोष्टीवरुन उमेश देशमुख आणि शिवाजी शिंदे यांच्यात वाद झाला.
यावेळी शिवाजी शिंदे यांनी संतापून खिडकीला पडदे अडकवण्याच्या रॉडने आपल्या चुलत जावयास मारहाण सुरु केली.
ADVERTISEMENT
ज्यामध्ये जावई उमेशचा जागीच मृत्यू झाला. जावयाची आपल्या हातून हत्या झाल्याचे लक्षात येताच शिवाजी शिंदे याने तिसऱ्या मजल्यावर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे शिंदे आणि देशमुख या दोन्ही कुटुबीयांना मोठा धक्का बसला आहे. पती-पत्नीचा भांडणामुळे दोन जणांनी जीव गमावल्याने संपूर्ण लातूरमध्ये याविषयी चर्चा सुरु आहे.
दरम्यान, याप्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंबंधी अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.
उल्हासनगर : धक्कादायक! 27 वर्षीय जावयाचा 45 वर्षीय सासूवर बलात्कार
उदगीर शहरात चाकूने प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी
उदगीर शहरातील भाजी मार्केट येथे 13 डिसेंबर रोज सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून थोडक्यात मिळालेली माहिती अशी की, 13 डिसेंबर रोजी शेख महंमद हा तरुण कामावरून भाजी मार्केट येथून घराकडे येत असताना भाजी मार्केटच्या कोपऱ्यावर एका आरोपीने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.
चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपी तात्काळ तिथून फरार झाला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जखमी अवस्थेतच उपचारासाठी प्रथम उदगीर येथील उदयगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी तरुणाची प्रकृती पाहून नातेवाईकांना त्याला लातूरला नेण्याचा सल्ला दिला.
सदरील तरुणांना उपचारासाठी आता लातूरला हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घटनास्थळाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आता गोळा करीत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT