नाशिकमध्ये लॉकडाउनची घोषणा, जाणून घ्या काय सुरु राहणार आणि काय बंद
प्रवीण ठाकरे, नाशिक प्रतिनिधी वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. १२ मे पासून दुपारी १२ वाजल्यापासून ते २३ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कठोर लॉकडाउनची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. या काळात लोकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असंही आश्वासन छगन भुजबळ यांनी दिलं आहे. नाशिक मधील […]
ADVERTISEMENT
प्रवीण ठाकरे, नाशिक प्रतिनिधी
ADVERTISEMENT
वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. १२ मे पासून दुपारी १२ वाजल्यापासून ते २३ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कठोर लॉकडाउनची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. या काळात लोकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असंही आश्वासन छगन भुजबळ यांनी दिलं आहे. नाशिक मधील लोकप्रतिनीधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान लॉकडाउन लावण्यात आल्यानंतर नाशिक शहरात काय सुरु राहिलं आणि काय बंद याची यादीच प्रशासनाने जाहीर केली आहे.
हे वाचलं का?
-
कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
किराणा आणि दूध या अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते दुपारी १२ यावेळे घरपोच सुरु राहतील.
ADVERTISEMENT
हॉटेल, खानावळ, मद्यविक्री या सेवा सकाळी ७ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत सुरु राहतील.
ADVERTISEMENT
सर्व भाजी बाजार आणि कृषी मार्केट बंद राहतील. याबदल्यात पर्यायी व्यवस्था विकेंद्रीकरण पद्धीतीने केली जाईल.
बांधकामं सुरु राहतील, या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची सोय करणं संबंधित व्यक्तींना बंधनकारक असेल.
विवाह फक्त ५ जणांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात होणार.
पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेतील व्यक्तींसाठीच खुले असतील.
बँका, पोस्ट ऑफिस, पतसंस्था केवळ सकाळी ९ ते १२ यावेळेत सुरु राहणार आहेत.
अडचणी खूप आहेत, लस घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया मंदावली आहे, असे सगळे प्रश्न असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नाही असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात लागणार कठोर लॉकडाऊन-हसन मुश्रीफ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT