कोरोना नाही पण भुकेमुळे नक्कीच जीव जाईल ! विडी कामगार महिलांना लॉकडाउनचा फटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. परंतू हे लॉकडाउन हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांच्या जिवावर उठताना दिसत आहे. सोलापुरातील विडी कामगार महिलांनाही या लॉकडाउनचा फटका बसतोय. शहरातील सर्व कारखाने सध्या बंद असल्यामुळे या महिला जमेल तसं घरातून काम करत आहेत. परंतू विडी बनवण्यासाठी लागणारी साधनसामग्री कमी पडत असल्यामुळे या महिलांसमोर पुन्हा एकदा अडचण तयार झाली आहे. त्यातचं मिळणारं उत्पन्नही कमी झाल्यामुळे कोरोना नाही पण एकदिवस भुकेमुळे नक्की जीव जाईल अशी भीती या महिलांनी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

सध्या सोलापुरातील विडी कामगार महिलांना तंबाखू आणि विडी बनवण्यासाठी लागणारं पान मिळत नाहीये. सर्व कारखाने बंद असल्यामुळे या महिलांची अडचण झाली आहे, त्यामुळे कारखाने लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी महिलांनी केली आहे. या कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे अनेक महिलांचं काम बंद झालं असून याचा फटका संपूर्ण कुटुंबाला बसत आहे. सोलापूर शहरातील वाढत्या रुग्णसंख्येची साखळी मोडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. शहरातली लोकं वर्क फ्रॉम होम करु शकतात…पण आमच्या घरातून काम करण्यालाही मर्यादा येत असल्यामुळे घर कसं चालवायचं असा प्रश्न पडत असल्याची भावना या महिलांनी बोलून दाखवली.

हे वाचलं का?

सोलापूर शहरात विडी उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. विडी उद्योगावर सोलापुरातील सुमारे ३० ते ४० हजार महिलांचं घर चालतं. फार पूर्वीपासून विडी उद्योग हा वर्क फ्रॉम होम सुरु आहे. विडी तयार करण्यासाठी लागणाचा कच्चा माल या महिलांना कारखान्यातून मिळतो….परंतू लॉकडाउनमुळे हाच कच्चा माल मिळत नसल्यामुळे अनेक महिलांचं काम सुटलं आहे. विडी वळणाऱ्या महिलांना दररोज १५० ते १८० रुपयांची बिदागी मिळते. परंतू लॉकडाउनमध्ये कच्चा माल मिळत नसल्यामुळे या हक्काच्या कमाईवरही या महिलांना पाणी सोडावं लागत आहे. त्यामुळे शहरातील कारखाने लवकरात लवकर उघडून आमचं कुटुंब वाचवा अशी मागणी या महिलांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT