कौतुकास्पद! लसीकरणामध्ये ८० लाखांचा टप्पा पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राज्यात एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना महाराष्ट्र सरकार लसीकरणाचा वेग वाढेल याकडेही आवर्जून लक्ष देत आहे. देशभरात सुरु झालेल्या लसीकरणाऱ्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. लसीकरणामध्ये ८० लाखांचा टप्पा पार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्याने आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील लसीकरण मिळवून ८१ लाख २७ हजार २४८ एवढे डोस दिले आहेत.

ADVERTISEMENT

सोलापुरातील रक्तपेढ्या व्हेंटिलेटरवर, आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

पाहूयात या यादीत पहिल्या पाच स्थानांवर कोणती राज्य आहेत ती –

हे वाचलं का?

१) महाराष्ट्र – ८१ लाख २७ हजार २४८

२) गुजरात – ७६ लाख ८९ हजार ५०७

ADVERTISEMENT

३) राजस्थान – ७२ लाख ९९ हजार ३०५

ADVERTISEMENT

४) उत्तर प्रदेश – ७१ लाख ९८ हजार ३७२

५) पश्चिम बंगाल – ६५ लाख ४१ हजार ३७०

कोरोनाचा वाढता कहर : केंद्राचं पथक राज्य सरकारच्या मदतीला येणार

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या चिंताजनक वाढीमुळे राज्य सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका तरुण पिढीला बसत आहे. यापासून त्यांना वाचवण्यासाठी २५ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याची परवानगी द्या अशा आशयाचं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहीलं आहे. याव्यतिरीक्त राज्याला लसींचे आणखी वाढीव डोस मिळावेत अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कामासाठी बाहेर पडणाऱ्या तरुण वर्गाला जर लस मिळाली तर वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मदत होईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

यावेळी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ब्रेक द चेन या उपक्रमाअंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले असून सर्वजण हे नियम पाळतील याची खात्री केली जात आहे. राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असून ४ एप्रिलपर्यंत ७६ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. ३ एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक ४ लाख ६२ हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

दीड कोटी लसीचे डोस द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून केंद्राने यासाठी राज्याला जास्तीचे डोस द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी पुढील ३ आठवड्यात लसीकरण वेगाने करण्यासाठी अधिकचे डोस मिळावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्राकडून लस मिळाल्यास…लसीकरणाला अधिक वेग मिळेल असंही ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलंय.

केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT