सचिन वाझेंविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे – ATS ची माहिती
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसने आज महत्वाची माहिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आतापर्यंत झालेल्या तपासात एटीएसला सचिन वाझेंविरोधात सबळ पुरावे हाती लागले असून २५ तारखेला वाझेंची कस्टडी मिळवण्यासाठी एटीएस कोर्टात अर्ज करणार असल्याचं महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी स्पष्ट केलं. बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसने आज महत्वाची माहिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आतापर्यंत झालेल्या तपासात एटीएसला सचिन वाझेंविरोधात सबळ पुरावे हाती लागले असून २५ तारखेला वाझेंची कस्टडी मिळवण्यासाठी एटीएस कोर्टात अर्ज करणार असल्याचं महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते सचिन वाझे!
“मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र एटीएस पथकाने गुन्ह्याची नोंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांची चौकशी केली. या चौकशीत सचिन वाझे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. स्कॉर्पिओ गाडी आपल्या ताब्यात कधीच नव्हती आणि मनसुख हिरेन यांना ओळखत नसल्याचं सचिन वाझेंनी सांगितलं. हिरेन यांच्या मृत्यूत आपला सहभाग नसल्याचंही वाझेंनी एटीएसला दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं. परंतू एटीएसच्या तपास अधिकाऱ्यांनी सचिन वाझेंचा दावा खोटा ठरवत पुरावे गोळा केले असून वाझेंचा या गुन्ह्यात नेमका काय तपास सुरु होता याची चौकशी सुरु आहे.”
हे वाचलं का?
प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या सिमकार्डचा शोध लावला. हे सिमकार्ड मुंबईमध्ये पत्त्याचा क्लब व बेटींग घेणाऱ्या व्यक्तीने सचिन वाझेंच्या सांगण्यावरुन गुजरातवरुन प्राप्त केली अशी महत्वाची माहिती एटीएसने दिली. ही सिमकार्ड गुजरातमधील एका कंपनीच्या नावे खरेदी करण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालंय. ही सिमकार्ड सचिन वाझेंच्या सांगण्यावरुन ATS च्या अटकेत असलेल्या नरेश गोर या आरोपीने दुसरा आरोपी विनायक शिंदे याला दिली. पॅरोलवर असणारे मुंबई पोलिसांचे माजी कर्मचारी विनायक शिंदे यांनी रजेवर असताना हा अपराध केला, त्यांनी मृतक हिरेन यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं होतं. या हत्येत विनायक शिंदे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाले असून ATS ने आरोपींना सोबत घेऊन मुंब्रा येथे मनसुख हिरेन यांची बॉडी सापडली त्या ठिकाणी क्राईम रिक्रिएशनही करून घेतलं आहे.
गोर याने गुजरातवरुन मागवलेल्या १४ सिमकार्डांपैकी काही सिमकार्ड सुरु करुन विनायक शिंदे यांच्याकडे दिली. याच सिमकार्डांचा गुन्ह्यात वापर झाल्याचं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालंय. नुकतच एटीएसच्या पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या व्होल्वो गाडीचाही ताबा घेतला आहे. सदरची कार गुन्ह्यात कशी वापरली गेली याची तपासणी कलिना येथील फॉरेन्सिकची टीम करत असल्याचं एटीएसचटे प्रमुख जयजीत सिंग यांनी स्पष्ट केलं. याव्यतिरीक्त या प्रकरणातील महत्वाची सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याचे काम सुरु असल्याचंही एटीएसने सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT