राज्याच्या गृह विभागाकडून मोहरम संदर्भात मार्गदर्शन सूचना जाहीर
राज्यात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट कायम आहे. मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा दिवस असलेल्या मोहरमच्या दिवसासाठी राज्य सरकारने आज मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. मोहरमच्या निमीत्ताने १८ आणि १९ ऑगस्टला मुस्लीम बांधव मातम मिरवणूका […]
ADVERTISEMENT
राज्यात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट कायम आहे. मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा दिवस असलेल्या मोहरमच्या दिवसासाठी राज्य सरकारने आज मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.
ADVERTISEMENT
मोहरमच्या निमीत्ताने १८ आणि १९ ऑगस्टला मुस्लीम बांधव मातम मिरवणूका काढतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम करु नये असंही राज्य सरकारने स्पष्ट केलंय.
वाझ/मजलीसचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम काढू नयेत. सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. या ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे असंही आवाहन करण्यात आलंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT