MLC Election 2023 : NCP च्या नेत्यानं वाढवलं उद्धव ठाकरेंचं ‘टेन्शन’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या (maharashtra mlc election 2023) पाच जागांसाठी निवडणूक होत असून, दिवसेंदिवस चुरस वाढत चाललीये. महाविकास आघाडीत (MVA) पाचपैकी दोन जागा काँग्रेसला (Congress), तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) आणि शेकापच्या (shetkari kamgar paksh) वाट्याला एक जागा आलीये. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं. नागपूरचा मतदारसंघ शिवसेनेकडे (UBT) असताना राष्ट्रवादीच्या इटकेलवार यांनी आव्हान दिलंय.

ADVERTISEMENT

अमरावती पदवीधर मतदार‎संघ, नाशिक पदवीधर मतदारसंघ, औरंगाबाद शिक्षक‎ मतदारसंघ, कोकण शिक्षक मतदारसंघ, नागपूर शिक्षक मतदारसंघ या पाच मतदारसंघात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होतेय. पाच जागांपैकी ठाकरेंच्या पारड्यात एक जागा आलीये. मात्र, तिथेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनं मैदानात उडी घेतलीये. त्यामुळे मविआचं मतांचं गणित बघडू शकतं.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचाच दिवस (12 जानेवारी) असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नागपूरच्या विधान परिषद निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणूक 2023 : राष्ट्रवादीच्या नेत्याची निवडणुकीत उडी

सतीश इटकेलवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळालेला नाही. असं असलं तरी ते निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. इटकेलवार यांनी विधान परिषद निवडणुकीत उडी घेतल्यानं महाविकास आघाडीत सर्व आलबेल नसल्याचं पुढे आलंय.

शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुणाला देण्यात आलीये उमेदवारी?

नागपूर शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुटला आहे. ठाकरे गटाकडून राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे हे निवडणूक लढवत आहे. नागपूरमध्ये शिवसेनेचं मतांचं बळ कमी आहे, मात्र महाविकास आघाडीच्या एकीने नाकाडे यांचा विजय सुकर होऊ शकतो, असं सांगितलं जात असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यानं निवडणुकीत उडी घेतलीये.

ADVERTISEMENT

नागपूर विधान परिषद निवडणूक 2023 : नागपूर शिक्षक मतदारसंघात चुरशी लढत

नागपूर शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीनंही उडी घेतलीये. आप कडून डॉ. देवेंद्र वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नागो गाणार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून अर्ज भरलेला असून, त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे. तर शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे मैदानात आहेत. विर्दभ माध्यमिक शिक्षक संघाकडून सुधाकर आडबाले यांनी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे नागपूर विधान परिषदेची निवडणूक किती चुरशीची होणार, हे अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT