अमरावती : ग्रामपंचायत निकालात काँग्रेसचा डंका; शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदे गटाचा धुव्वा
अमरावती : राज्यात विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात अमरावती जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे. या निकालांमध्ये काँग्रेस आणि भाजपचा डंका वाजला असून शिवसेना, राष्ट्रवादी व शिंदे गटाचा धुव्वा उडाला आहे. पाच ग्रामपंचायतींपैकी तीन काँग्रेसकडे, एक प्रहारकडे आणि एका ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकवला. अमरावतीमध्ये काँग्रेसकडे उंबरखेड, घोटा, कवाडगव्हाण या तीन […]
ADVERTISEMENT
अमरावती : राज्यात विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात अमरावती जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे. या निकालांमध्ये काँग्रेस आणि भाजपचा डंका वाजला असून शिवसेना, राष्ट्रवादी व शिंदे गटाचा धुव्वा उडाला आहे. पाच ग्रामपंचायतींपैकी तीन काँग्रेसकडे, एक प्रहारकडे आणि एका ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकवला.
ADVERTISEMENT
अमरावतीमध्ये काँग्रेसकडे उंबरखेड, घोटा, कवाडगव्हाण या तीन ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा बोलबाला राहिला. यात उंबरखेडच्या सरपंचपदी नितीन कळंबे, घोटाच्या सरपंचपदी रुपाली राऊत, कवाडगव्हाणच्या सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी विजयी झाल्या. चांदूरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे, तर हरिसाल ग्रामपंचायतमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे विजय रामेश्वर दारशिंबे सरपंचपदी विजयी झाले.
राज्य निवडणूक आयोगाने 16 जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर केल्या होत्या. यातील 51 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध पार पडल्या होत्या. तर 547 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते. यासाठी 66.10 टक्के मतदान पार पडले होते. सोबतच सरपंचपदाच्याही थेट जनतेतून निवडणुका पार पडल्या होत्या. मागील काही काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुट आणि सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागले होते.
हे वाचलं का?
सातारा : राष्ट्रवादीच्या 2 आमदारांनी ताकद लावलेल्या खेड ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा
साताऱ्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा :
साताऱ्यातील सर्वात मोठ्या आणि सातारा शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. शिंदे यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवत सत्तांतर केले असून सरपंचपदही काबिज केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT