‘पंकजा मुंडेंना मोठं पद मिळेल’; गिरीश महाजनांचं विधान, खडसेंना दिलं प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सल बोलून दाखवली. पंकजा मुंडे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये. याच विधानावर आता भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचं विधान केलंय. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांनाही प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT

कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांचं जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तर्फे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “राज्यातील विविध विकास कामांना गती दिली जाईल. लवकरच खाते वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल.”

शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीवर इतका राग का?; जयंत पाटलांनी सांगितलं कारण

हे वाचलं का?

गोपीनाथ मुंडे यांच्याशी निगडित लोकांना बाजूला ठेवण्यात आल्याचा, ओबीसींबवर अन्याय केल्याचा आरोप होतोय. यावर गिरीश महाजन म्हणाले, “त्यांना सांगा गुलाराव पाटील ओबीसी आहेत. मी (गिरीश महाजन) सुद्धा ओबीसी आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आहात म्हणून ओबीसी आहेत, असं समजू नका. यादी बघतिली, तर मोठ्या प्रमाणात ओबीसी आहेत. सगळ्यानांच न्याय दिला गेला आहे.”

“अजून अर्धेही मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. अजून २३ मंत्र्यांचा शपथविधी बाकी आहे. त्यामध्ये महिला असतील, ओबीसी असतील, सगळ्याच घटकांचा सहभाग असेल”, असं उत्तर गिरीश महाजनांनी दिलं.

Mood Of The Nation : भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे का? काय सांगतो सर्व्हे?

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर गिरीश महाजनांनी काय सांगितलं?

पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी काही अजून बघितलेलं नाही. पण पंकजा मुंडे यांची कुठे नाराजी आहे, असं मला वाटत नाही. पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्यांच्याबद्दल गांभीर्याने विचार करतील. पंकजा मुंडे अजून मोठं पद मिळेल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत, असं म्हणण्याचं कारण नाही”, असं उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं.

ADVERTISEMENT

पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली सल?

मुंबईत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मंत्रिमंडळ करताना सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झालेत, त्यांनी लोकांचं समाधान करावं. मी चर्चेत राहणारेच नाव आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रिपद दिले नसेल. जेव्हा मी पात्र असल्याचं त्यांना वाटेल तेव्हा ते देतीलच.” पंकजा मुंडेंच्या याच विधानावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केल्याची चर्चा केली जात आहे.

Mood Of The Nation : आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपसाठी धक्कादायक चित्र

एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. “दोघांनी तू तू मैं मैं करण्यापेक्षा जिल्ह्याचा विकास करावा”, असं खडसे म्हणाले होते. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर दिले. “एकनाथ खडसे यांनी शांतता ठेवावी. आपणच तु तू मै मै करू नका. आपल्या सरकारनं मागे काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्यावा”, असं गिरीश महाजन हे एकनाथ खडसेंना उत्तर देताना म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT