Maharashtra Corona Cases: बापरे… महाराष्ट्रात दिवसभरात 483 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू, मृत्यूदरातही वाढ
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (13 जून) दिवसभरात कोरोनाच्या (Corona Paitents) 483 पॉझिटिव्ह रुग्ण मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,11,104 जणांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहेत. मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं दिसून आलं होतं. पण मृतांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हीच गोष्ट महाराष्ट्र शासनासाठी सर्वात चिंतेची बाब आहे. गेल्या […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (13 जून) दिवसभरात कोरोनाच्या (Corona Paitents) 483 पॉझिटिव्ह रुग्ण मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,11,104 जणांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहेत. मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं दिसून आलं होतं. पण मृतांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हीच गोष्ट महाराष्ट्र शासनासाठी सर्वात चिंतेची बाब आहे.
ADVERTISEMENT
गेल्या 24 तासात राज्यात 10,442 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर आता पु्न्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 55 हजार 588 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 7,504 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.44 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 483 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.88 टक्के एवढा आहे.
हे वाचलं का?
Corona Test: कोरोना चाचणीसाठी गेलेल्या सरपंचांच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक अन् घशात जाऊन अडकली!
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,55,588ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
ADVERTISEMENT
-
मुंबई (Mumbai) – 18 हजार 166
ठाणे (Thane) – 15 हजार 977
पुणे (Pune) – 18 हजार 571
नागपूर (Nagpur) – 6 हजार 347
नाशिक (Nashik)- 4 हजार 818
कोल्हापूर (Kolhapur) – 16 हजार 835
अहमदनगर (Ahmednagar) – 5 हजार 424
सातारा (Satara) – 9 हजार 928
औरंगाबाद (Aurnagabad)- 1 हजार 809
लातूर (Latur) – 2 हजार 690
आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 18 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय कोल्हापुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 16 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
मुंबईत दिवसभरात सापडले 700 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 700 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 704 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 83 हजार 382 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. डबलिंग रेट 653 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT