राज्यात गेल्या 24 तासात दगावले तब्बल 594 कोरोना रुग्ण

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 34,031 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून तो 1 जूनपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र असं असलं तरी राज्यात कोरोनामुळे 594 जणांचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 34,031 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून तो 1 जूनपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र असं असलं तरी राज्यात कोरोनामुळे 594 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज मृतांचा आकडा (Deaths) कमी झालेला असला तरीही हा आकडा प्रशासनासाठी दिलासादायक नक्कीच नाही. पण सध्या एक चांगली बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. त्यामुळे राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी झाला असून सध्याच्या घडीला राज्यात 4 लाख 01 हजार 695 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. इतर आस्थापने देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, असं असून देखील रुग्णांचा आकडा हा अजून योग्य प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण दुसरीकडे मृतांचा आकडा म्हणावा त्या प्रमाणात कमी होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी कायम आहे.

गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!

हे वाचलं का?