जरंडेश्वर साखर कारखान्यावर ED ने आणली जप्ती, आता अजित पवार ईडीच्या रडारवर?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर येते आहे आणि ती अशी आहे की ED ने आता अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आणली आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर ते बुडवलं. यानंतर साखर कारखान्यांची कमी भावात विक्री करण्यात आली.

ADVERTISEMENT

याप्रकरणी ज्येष्ठ समजासेवक अण्णा हजारे यांनी बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आज जप्तीची कारवाई केली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय हेच हा साखर कारखाना चालवत होते. या सगळ्या प्रकरणावर मोठं रणकंदन माजलं होतं. अजित पवारांचे नातेवाईक मालक असलेल्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे त्यामुळे आता अजित पवार हे ईडीच्या रडारवर आले आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

25 हजार कोटींच्य कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये आरबीआयने बँकेचे तत्कालीन मंडळच बरखास्त केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची नावं होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांची नावं होती.

हे वाचलं का?

फेब्रुवारी 2021 मध्ये राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 जणांना क्लिन चिट देण्यात आली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये या प्रकरणी निवृत्त न्यायाधी पंडितराव जाधव यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून अहवाल सहकार आयुक्तांना देण्यात आला होता. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 65 जणांना क्लिन चिट देण्यात आली होती.

आता एकीकडे अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. त्यांना शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी गृहमंत्रीपदही सोडावं लागलं आहे. अशात आता अजित पवार हेदेखील ईडीच्या रडारवर असणार का प्रश्न या सगळ्या कारवाईमुळे उपस्थित होतो आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT