Maharashtra Unlock : दुकानांच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत वाढवणार- उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आणि कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन लेव्हल थ्रीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. अशात कोरोना बाधितांची संख्या कमी झालेल्या झोनमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सांगली दौऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पुणे व्यापारी संघाने दुकानं संध्याकाळी सात पर्यंत सुरू ठेवण्याची संमती द्या नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

पुणे व्यापारी संघाच्या या इशाऱ्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मी कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जेव्हा मोठ्या प्रमाणावर वाढली होती तेव्हा रोज ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी कोणीही मदतीला आलं नाही. कोणत्याही दुकानात ऑक्सिजन विकत मिळत नाही. सगळी सोय आपली आपल्याला करावी लागते. कुणीही मदत करत नाही, आता जे कोणी इशारे, धमक्या देत असतील त्यांना देऊ द्या. मी सगळ्यांच्या आऱोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असेच निर्णय घेतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीचा दौरा केला. तिथल्या पूरपरिस्थितीची त्यांनी पाहणी केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी दुकानं रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवणार आहोत असं सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव 25 जिल्ह्यांमध्ये कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसंच त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही दुकानं रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT