Rain : ठाणे, पुण्यासह 7 जिल्ह्यांसाठी आजचा दिवस काळजीचा! मुंबईसह महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’
मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाची संततधार कायम असून, आज सर्वदूर मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील सात जिल्ह्यांत पाऊत तीव्र होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीसदृश्य पाऊस कोसळत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही दिवसांत […]
ADVERTISEMENT
मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाची संततधार कायम असून, आज सर्वदूर मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील सात जिल्ह्यांत पाऊत तीव्र होणार आहे.
ADVERTISEMENT
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीसदृश्य पाऊस कोसळत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात आज (१३ सप्टेंबर) ठाणे, पुण्यासह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
मुंबईतही पावसाचा जोर कायम राहणार असून, राज्याच्या इतर भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra: Rainfall causes traffic congestion at Western Express Highway in Goregaon pic.twitter.com/jAOw7tGdr6
— ANI (@ANI) September 12, 2021
उद्याही (१४ सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहणार
ADVERTISEMENT
राज्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
‘बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टीवर पुढचे ३ ते ४ दिवस वारे जोरदार असतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे’, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे उपसंचालक होसाळीकर यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML).येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली,तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.परीणामी पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४दिवस वारे जोरदार असतील,राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता. pic.twitter.com/9W8nixwzHC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2021
१५ सप्टेंबरला कसा असेल पाऊस?
हवामान विभागानं १५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गुरुवारी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी फक्त पालघर जिल्ह्यालाच यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT