गेटवे ऑफ इंडियाजवळील घटना : मांडवाकडे निघालेल्या बोटीतील प्रवासी पडला समुद्रात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नेहमी पर्यटकांच्या वर्दळ असलेल्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात बोटीतून प्रवासी पडल्याची घटना घडली. मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी समुद्रात पडला. मात्र, पोहता येत असल्यानं प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत कांबळे असं बोटीतून समुद्रात पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. स्वतःच्याच चुकीमुळे बोटीतून पडल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही.

हे वाचलं का?

प्रशांत कांबळे हा सकाळी नऊ वाजताच्या अजंठा बोटीने गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवाकडे निघाला होता. बोटीच्या एका बाजूला प्रशांत हा उभा होता. त्यावेळी बोटीच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी उभे राहू नका, अशी सूचना केली. मात्र, प्रशांतने त्याकडे दुर्लक्ष केले.

ADVERTISEMENT

त्यानंतर काही वेळाने तोल जाऊन तो समुद्रात पडला. प्रशांत सामानसह समुद्रात पडला. मात्र, पोहता येत असल्याने तो बोटीपर्यंत पोहत आला. बोटीतून त्याला दोरी टाकुन समुद्रातून वर काढण्यात आलं.

ADVERTISEMENT

दरम्यान, आपण स्वतःच्या चुकीमुळेच समुद्रात पडलो असं प्रशांतने मांडवा पोलिसांना सांगितलं. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT