जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : एकनाथ खडसेंना झटका! मंदाकिनी खडसेंचा पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रचंड चुरशीच्या ठरलेल्या आणि गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैराची प्रचिती देणाऱ्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आलाय. निवडणूक निकालात एकनाथ खडसेंना झटका बसला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला आहे.

ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात जोरदार राजकीय धुरळा उडाला. दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून ऐनवेळी उमेदवारी दाखल करून मंदाकिनी एकनाथ खडसे यांनाच आव्हान दिलं होतं. चव्हाण यांच्या उमेदवारीवर खडसे यांनी हरकतही घेतली होती.

दरम्यान, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, जळगाव जिल्ह्यातील बड प्रस्थ असलेले एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

हे वाचलं का?

मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज भरला होता. मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासमोर एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलच्या उमेदवार मंदाकिनी खडसे यांचं आव्हान होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT