पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत उमेदवार कोण? राष्ट्रवादीसमोर धर्मसंकट
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातली पोडनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरायला लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असला तरीही अद्याप कोणीही आपली उमेदवारी जाहीर न केल्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच मतदार संघात प्रबळ मानल्या जाणाऱ्या परिचारक गटानेही आपली भूमिका अजूनही गुलदस्त्यात ठेवली असल्यामुळे मंगळवेढ्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय […]
ADVERTISEMENT
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातली पोडनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरायला लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असला तरीही अद्याप कोणीही आपली उमेदवारी जाहीर न केल्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच मतदार संघात प्रबळ मानल्या जाणाऱ्या परिचारक गटानेही आपली भूमिका अजूनही गुलदस्त्यात ठेवली असल्यामुळे मंगळवेढ्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे.
ADVERTISEMENT
भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळत असले तरीही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची देणी, राष्ट्रवादी काँग्रेसमधले चव्हाट्यावर आलेले अंतर्गत वाद, पक्षांतर्गत धुसफूस यामुळे मतदार संघातलं वातावरण गढूळ बनलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांबद्दल चाचपणी सुरु असून अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रविवारी मंगळवेढ्यात जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन गटबाजी शमवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जर भारत भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी दिली तर मतदार संघात भाजपकडे सक्षम महिला चेहरा नसल्यामुळे शिवसेनेच्या शैला गोडसे यांना आपल्या गोटात घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात धनगर समाजाची मोठी वस्ती आहे. सुमारे ८० हजार धनगर वस्ती असलेल्या या मतदार संघात समाजाच्या नेत्यांनी बैठका घेऊन राजकीय पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे धनगर समाजाची मागणी मान्य न झाल्यास हा समाज कोणाच्या पारड्यात आपली मत टाकतो याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. या मतदार संघाची जबाबदारी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्याकडे देणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मध्ये राजकीय पक्ष नेमके कोणाला उमेदवार म्हणून जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
हे वाचलं का?
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम –
२३ मार्च ते ३० मार्च – उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा कालावधी
ADVERTISEMENT
३१ मार्च – आलेल्या सर्व अर्जांची छाननी
ADVERTISEMENT
३ एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
१७ एप्रिल – मतदान
२ मे – मतमोजणी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT