लाइव्ह
Marathi News Live : ‘नार्वेकरांनी, मिध्यांनी माझ्यासोबत जनतेत यावं, मग…’ ठाकरेंचे आव्हान
Marathi News Live Update : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत. या महापत्रकार परिषदेत ते काय गौप्यस्फोट करतात, हे पाहावे लागणार आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर शिंदे गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज चार दिवसाच्या दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरून विरोधकांनी त्यांना घेरले आहे. तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. 22 जानेवारीपासून हा सोहळा चालणार आहे.यासह राज्यातील राजकीय आणि इतर घडामोडींसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 10:31 PM • 16 Jan 2024
देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने वाटचार-अनंत गीते
गल्लीपासून दिल्ली पर्यंत काँग्रेसचे राज्य होतं. पंतप्रधानदेखील काँग्रेसचाच होता व सरपंचदेखील काँग्रेसचा होता. मात्र त्यावेळी असं घाणेरडे राजकारण काँग्रेसने कधीही केलं नसल्याची टीका अनंत गीते यांनी केली. भाजपच्या घाणेरड्या राजकारणाची सर्वसामान्यांच्या मनामध्ये चीड आहे त्यामुळे भाजपकडून कोणतीही निवडणूक घेण्यात येत नाही. भाजप हा घाबरलेला पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आपला देश हा आता हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले - 09:55 PM • 16 Jan 2024
मराठा आरक्षण यशस्वी होण्यासाठी तुळजाभवानीला साकडे- जरांगे पाटीलही सहभागी
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज बांधवानी धाराशिव ते तुळजापूर अशी महावाहन रॅली काढत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी आरती करुन साकडे घातले. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी फोनवरून संवाद साधला. या रॅलीमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांसह एक मराठा, कोट मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मराठा बांधव सहभागी झाले. तुळजापूर शहरात प्रवेश करताच तुळजापूर येथील बांधवानी त्यांचे स्वागत केले. मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांसह सर्व समाज बांधवांचे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी तुळजाभवानी देवीला साकडे घातले. - 07:18 PM • 16 Jan 2024
मी यांना काय कमी केलं होतं..., ठाकरे शिंदेंच्या आमदारावर भडकले
mumbaitak - 07:04 PM • 16 Jan 2024
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला
mumbaitak - 06:40 PM • 16 Jan 2024
नार्वेकरांनी, मिध्यांनी माझ्यासोबत जनतेत यावं, मग... ठाकरेंचे आव्हान
लबाडाने नाही तर लवादाने जो निकाल दिला त्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सरकार कोणाचंही असो सत्ता ही सामान्यांची असावी, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच नार्वेकरांनी आणि मिध्यांनी माझ्यासोबत जनतेत यावं आणि पोलीस प्रोटेक्शन नाही, तिथे नार्वेकरांनी तिथे सांगाव शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवाव कुणाला पुरावा, गाडावा की त़ुडवावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. - 05:37 PM • 16 Jan 2024
नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचाच निकाल वाचला- अनिल परब
mumbaitak - 05:15 PM • 16 Jan 2024
राहुल नार्वेकरांनी पक्षाचा राजीनामा द्यायला हवा होता - असीम सरोदे
जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते. तेव्हा तटस्थ वागले पाहिजे, पक्षनिरपेक्ष आणि प्रामाणिकपणे वागले पाहिजे. अशी अट कायद्याला अपेक्षित आहे.विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर नैतिक, प्रामाणिकता ठेवून पक्षाचा राजीनामा द्यावा. राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही त्याला सरंक्षण आहे. पण त्यांनी राजीनामा दिला नव्हता, असे असीम सरोदे यांनी सांगितले. राहुल नार्वेकर असे वागत असतील तर कायद्यावर विश्वास राहिल का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. - 05:09 PM • 16 Jan 2024
...तर एकनाथ शिंदे गट अपात्र ठरतो- असीम सरोदे
जर कुणी पक्ष सोडला असेल तर ते दुसऱ्या पक्षात विलिन होऊ शकतात. ते गट स्थापण करून नतंर एखादा पक्ष स्थापण करू शकतात. पण एकनाथ शिंदे गट कोणत्याही पक्ष स्थापण केला नाही. आणि कोणत्याही पक्षात सामील झाले नाही. आता पण हेच सांगतात आम्हीच शिवसेनेत आहोत,आमचीच शिवसेना आहे. त्यामुळे ते अपात्र ठरतात, ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेल्या सुरुवातीची परिस्छिती आहे, असे असीम सरोदे यांनी सांगितले. - 05:05 PM • 16 Jan 2024
न्यायालय एक व्यवस्था आणि यंत्रणा म्हणून दबावाखाली - असीम सरोदे
mumbaitak - 04:45 PM • 16 Jan 2024
शिवसेना चोर-लफंग्यांच्या हातात दिली- संजय राऊत
शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल, लवाद म्हणा राहुल नार्वेकर यांनी दिला. लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या, विधानसभेच्या अध्यक्षांच्या अंत्ययात्रा निघाल्या. शिवसेना ही ज्या पद्धतीने या लवादाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्याच्या हातात दिली आणि शिवसेना तुमची त्यामुळे महाराष्ट्रात खदखद व्यक्त झाली. हा निकाल त्यांच्या बायकोलाही मान्य नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. - 04:35 PM • 16 Jan 2024
...आता जनताच खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते-सचिन अहिर
जनताच खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने काही निकष काढले आहेत, तरीही एक वेगळी संस्था असा निर्णय घेऊ शकतात असा सवालही ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. न्यायाची भाषा चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर जाऊ नये यासाठीही आम्ही महापत्रकार परिषद घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. - 04:30 PM • 16 Jan 2024
शिंदे गटाचे भ्रमजाल तोडण्यासाठीच ही पत्रकार परिषद-सुषमा अंधारे
लोकांसमोर ठाकरेंची भूमिका गेली पाहिजे, त्याच बरोबर जनतेकडून न्यायाची अपेक्षा केली जात असून त्यासाठी ही पत्रकार परिषदे घेत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी घटनाबाह्य निर्णय कसा दिला असून ही भूमिका मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले - 04:20 PM • 16 Jan 2024
मराठा आंदोलनामुळे गुजरातमधून फोर्स आणला जाणार-मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सुरक्षेसाठी गुजरातमधून फोर्स मागवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की, त्यांना ही माहिती कुठून मिळाली माहिती नाही मात्र असं झालं तर हे दुर्देवी ठरणार असल्याचे म्हटले आहे. - 03:00 PM • 16 Jan 2024
लोकसभेसाठी आरपीआयला दोन जागा द्या- रामदास आठवले
लोकसभा निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळाव्यात अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. शिर्डी, सोलापूर आणि अकोला या आरक्षित जागांपैकी दोन जागा आरपीआय पक्षाला देण्याची मागणी करून त्यानंतर आरपीआयला राष्ट्रीय मान्यता मिळेल अशी प्रतिक्रियाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आम्ही अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याही भेट घेऊ असंही त्यांनी सांगितले. - 02:40 PM • 16 Jan 2024
सरकारचा जीआर मनोज जरांगेंना देणार- बच्चू कडू
mumbaitak - 01:36 PM • 16 Jan 2024
ठाकरेंची महापत्रकार परिषद! आता खोट्याचं खरं होणार...
उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेला अवघे काही तास उरले आहेत. या महापत्रकार परिषदेची जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी ठाकरे सेनेने टीझरही जारी केला आहे. या टीझरमध्ये आता खोट्याच खरं होणार आणि जनतेच्या न्यायालयात बाजू मांडणार असे देखीस या टीझरमध्ये सांगितले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय बोलतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. - 01:19 PM • 16 Jan 2024
तलाठी भरतीच्या एसआयटी चौकशीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन
तलाठी भरती घोटाळ्याविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये विद्यार्थ्यांनी तलाठी भरती घोटाळ्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. संभाजीनगर मध्ये हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. तसेच तलाठी भरतीची SIT चौकशी आणि इतर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. - 11:35 AM • 16 Jan 2024
महापत्रकार परिषदेचा ठाकरेंकडून टीझर आऊट
mumbaitak - 11:32 AM • 16 Jan 2024
सुप्रिया सुळे यांनी घेतली सुनील केदारांची भेट
खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे काल रात्री खासगी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी नागपुरातील केदार यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सुनील केदार यांच्या पत्नी,मुलगी आणि सासू उपस्थित होत्या. दरम्यान केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणी गेल्याच आठवड्यात जामीन मिळाल्याने तुरूंगातून सुटका झाली होती. - 11:32 AM • 16 Jan 2024
घाबरलेल्या मुख्यमंत्र्यांनी...आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना पुन्हा डिवचलं
mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT