पतीने पत्नीला समोसा आणला नाही..बायकोनं माहेरच्या लोकांना बोलावून पतीला धू-धू-धुतलं! प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं अन्..

Husband And Wife Shocking Viral News : पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण उत्तरप्रदेशच्या पीलीभीतमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Husband And Wife Clash Viral News
Husband And Wife Clash Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समोसा आणला नाही म्हणून बायकोनं नवऱ्याला कुटला

point

गावात बैठक घेतली..तेव्हाही कुटुंबियांनी नवऱ्याला धुतला

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Husband And Wife Shocking Viral News : पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण उत्तरप्रदेशच्या पीलीभीतमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आहे. पीलीभीतमध्ये समोस्याची खूप चर्चा आहे. कारण याच कारणामुळे इथे पत्नी-पत्नीत जोरदार भांडण झालं. पतीने पत्नीला समोसा आणला नाही, म्हणून पत्नीने पतीला मारहाण केली. पत्नी-पत्नीच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबियांकडून महिला आणि तिच्या कुटुंबियांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पूरनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगवंतापूर गावात राहणाऱ्या शिवमचं लग्न 22 मे रोजी संगितासोबत झालं होतं. 29 ऑगस्टच्या सायंकाळी संगीताने तिचा पती शिवमला गरम गरम समोसा आणण्यासाठी सांगितलं. पण शिवम म्हणाला की, त्याचे पैसे कुठेतरी पडले. त्यामुळे तो समोसा आणू शकला नाही. त्यानंतर पत्नीने पतीसोबत जोरदार भांडण केलं आणि जेवणही केलं नाही.

हे ही वाचा >> शीना बोरा मर्डर केसमध्ये 10 वर्षानंतर महत्त्वाच्या साक्षीदाराचा खळबळजनक खुलासा! इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी...

पत्नीसह तिच्या कुटुंबियांनी जावयाला केली मारहाण

तसंच तिने कुटुंबियातील लोकांना घरी बोलावलं. त्यानंतर त्या सर्वांनी मिळून पतीला मारहाण केली, असा आरोप केला जात आहे. तसच त्याचे भाऊजी जीजा रामकरण, आई विजय कुमारीलाही मारहाण केली. या घटनेनंतर गावतीला लोकांनी माजी सरपंच अवधेश शर्मा यांच्या घरी बैठक घेतली. तेव्हा संगीताच्या माहेरच्या लोकांनी पुन्हा शिवम आणि त्यांच्या कुटुंबियांवर त्या ठिकाणीही हल्ला केला.

या मारहाणीत शिवमचे भाऊजी रामकरण जखमी झाले. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सरला-विमला, रामावतार आणि धनीराम विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. पूरनपूरचे सीओ प्रतिक दहिया यांनी म्हटलं की, 29 ऑगस्टच्या सायंकाळी दोन कुटुंबात मारहाण झाली होती. तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या एका तरुणावर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा >> GF सोबत शारीरिक संबंध केले..प्रेग्नंट झाल्यावर मित्राने गर्भपाताच्या गोळ्या पाठवल्या, तरुणी BF विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेली अन्..

हे वाचलं का?

    follow whatsapp