शीना बोरा मर्डर केसमध्ये 10 वर्षानंतर महत्त्वाच्या साक्षीदाराचा खळबळजनक खुलासा! इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी...
2015 मध्ये झालेल्या एका हाय प्रोफाइल मर्डरने संपूर्ण देश हादरून गेला होता. तब्बल 10 वर्षांनंतर या केसमधील महत्त्वाची साक्षीदार विधी मुखर्जीने धक्कादायक खुलासे केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शीना बोरा मर्डर केसमध्ये साक्षीदाराचा खळबळजनक खुलासा!

तब्बल 10 वर्षांनंतर समोर आल्या 'त्या' गोष्टी
Sheena Bora murder case: 2015 मध्ये झालेल्या एका हाय प्रोफाइल मर्डरने संपूर्ण देश हादरून गेला होता. एका श्रीमंत घरातील मुलगी शीना बोराची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी मृताची आई इंद्राणीला मुखर्जीला आरोपी ठरवण्यात आलं. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला आणि यामध्ये विधी मुखर्जी ही महत्त्वाच्या साक्षीदार होती. तब्बल 10 वर्षांनंतर तिने धक्कादायक खुलासे केले. विधीच्या म्हणण्यानुसार, तिच्या नावावर सीबीआयने खोटे जबाब नोंदवले होते. कोर्टात तिच्या नावाने केलेले जबाब खोटे आणि बनावट असल्याचं तिने सांगितलं. यामुळे ही केस आणखी एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
आपल्या नावावर असे खोटे आणि बनावट जबाब नोंदवण्यामागे नक्कीच वाईट विचार असल्याचा विधी मुखर्जीने दावा केला. तसेच, पोलिसांच्या चौकशीदरम्यान, ती एकटी नव्हती. तिच्यासोबत नेहमी तिचे सावत्र वडील पीटर मुखर्जी, बहीण शंगोन दास गुप्ता आणि मुलगा राबिन मुखर्जी उपस्थित होते.
सावत्र वडील आणि भावांवर केला आरोप
विधी मुखर्जीने आरोप केला की तिचे सावत्र वडील तपास अधिकाऱ्यांना माहिती पुरवत असायचे. शीना बोरा प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आरोपी असून सह-आरोपी संजीव खन्ना आहेत. विधी मुखर्जी ही संजीव खन्ना यांची मुलगी आहे. विधीने पीटर मुखर्जी यांचे मुलगा राहुल आणि रॉबिन यांच्यावरही आरोप केले आहेत. तिने म्हटलं की राहुल आणि रॉबिनने त्यांच्या आईची मालमत्ता हडप केली.
विधीच्या म्हणण्यानुसार, इंद्राणी मुखर्जीच्या अटकेनंतर 15 दिवसांच्या आत, कोट्यवधी रुपयांचे वडिलोपार्जित दागिने आणि 7 कोटी रुपये बँक बचत खात्यातून काढण्यात आले. हे सर्व पीटरच्या संमतीने घडले. विधीने कोर्टात सांगितलं की, "माझ्या वडिलांना नोव्हेंबर 2015 मध्ये राहुल आणि रबिन यांना अटक केली होती. त्यांनी हे दागिने त्याच्या खूप आधीच घेतले होते."
रॉबिनवर धमकावण्याचे आरोप
इंद्राणीच्या एएनझेड बँक खात्यातून तिच्या परवानगीशिवाय पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप विधीने केला. त्यावेळी राहुल काम करत नव्हता आणि रॉबिनची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. यामध्ये इंद्राणीला अडकवण्याचा राहुल आणि रॉबिनचा उद्देश होता. इंद्राणी तुरुंगातून बाहेर पडू नये अशी त्यांची इच्छा होती. जेव्हा इंद्राणीला अटक करण्यात आली तेव्हा तिच्याकडे वकील तयार करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. विधीचा दावा आहे की रॉबिनने तिला धमकी दिली की, "तुझी आई जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे आणि ती कधीही बाहेर येणार नाही."
हे ही वाचा: लग्नाच्या 25 दिवसानंतर दुसरी नवरी घरी आणली..पहिली पत्नी पोलिसांना म्हणाली, पतीच्या 2 मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणून..
सरकारी वकिलांच्या चौकशीदरम्यान, विधी मुखर्जी म्हणाली की, इंद्राणी आणि शीना बोरा यांचे सुरुवातीला खूप चांगले संबंध होते. परंतु, पीटर मुखर्जींचा मुलगा राहुलचे शीनाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्यामुळे परिस्थिती बदलली. राहुल आणि शीना ड्रग्ज घेत असल्याचे उघडकीस आल्यावर मोठा वाद सुरू झाला.
मुलाला योग्य मार्गावर आणण्याची इंद्राणीची इच्छा
विधी असंही म्हणाली की इंद्राणीला राहुलने त्याच्या ड्रग्जच्या व्यसनापासून मुक्त व्हावे अशी इच्छा होती. त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी ती त्याच्याशी कठोर वागत होती. विधीने पुढे सांगितलं की 2013 मध्ये शीनाचा एक ईमेल आला होता. पण खरं तर शीनाची हत्या 2012 मध्येच झाली होती.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो 4 चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार... 'या' स्थानकांवरून धावणार मेट्रो
फ्लॅटचं ट्रान्सफर थांबवण्यासाठी पीटरचं 'ते' कृत्य
विधी म्हणाली की तिच्या आई-वडिलांच्या अटकेचा तिच्या आयुष्यावर वाईट परिणाम झाला. ती निराधार झाली आणि तिच्याकडे राहण्यासाठी जागाही नव्हती. राहुल आणि तिच्या भावासह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना घराबाहेर काढलं. विधीने असा दावा केला की तिच्या आईच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी तिला तिच्या वारशातून वंचित करण्यात आलं. "पीटर मुखर्जीने माझ्या नावावर फ्लॅटचं ट्रान्सफर थांबवण्यासाठी बिल्डिंगच्या सोसायटीला पत्र लिहिले" अशी विधीने साक्ष दिली. हा फ्लॅट विधीला तिच्या 18 व्या वाढदिवशी भेट म्हणून मिळणार होता.
विधीने तो काळ तिच्या आयुष्यातील सर्वात दु:खद काळ असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की तिचे स्वतःचे नातेवाईक तिच्या आईच्या वस्तूंसाठी भांडत होते तसेच, इंद्राणी यांना तुरुंगात भेटायला कोणीही गेले नव्हतं. रॉबिनने तिच्यावर इंद्राणीविरुद्ध जबाब देण्यासाठी दबाव आणल्याचा विधीने आरोप केला.