कन्नड अभिनेत्रीने केली प्रियकराची हत्या, मद्यधुंद अवस्थेत असतानाच लव्ह ट्रँगलमुळे वादाची ठिणगी, क्रूरपणे संपवलं

मुंबई तक

Crime News : मुख्य आरोपी बिंदू ही गेल्या काही काळापासून मोहन राव यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही आपापल्या जोडीदारांपासून विभक्त झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान बिंदूची मैत्री धनुष आणि विनय नावाच्या दोन तरुणांशी झाली. हे दोघेही वारंवार बिंदूच्या घरी येत असत, ज्यावरून मोहन राव आणि बिंदू यांच्यात सतत खटके उडत होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कन्नड अभिनेत्रीने केली प्रियकराची हत्या

point

मद्यधुंद अवस्थेत असतानाच लव्ह ट्रँगलमुळे वादाची ठिणगी, क्रूरपणे संपवलं

Crime News : कर्नाटकच्या बंगळुरुमधून एका थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये एका कन्नड अभिनेत्रीचा सहभाग समोर आल्याने खळबळ माजली आहे. 18 फेब्रुवारी रोजी 40 वर्षीय मोहन राव यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, ही नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी कन्नड चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करणारी उर्मिला उर्फ बिंदू आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

लव्ह लव्ह ट्रँगलमुळे वादाची ठिणगी, अन् हत्याकांड

तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी बिंदू ही गेल्या काही काळापासून मोहन राव यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही आपापल्या जोडीदारांपासून विभक्त झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान बिंदूची मैत्री धनुष आणि विनय नावाच्या दोन तरुणांशी झाली. हे दोघेही वारंवार बिंदूच्या घरी येत असत, ज्यावरून मोहन राव आणि बिंदू यांच्यात सतत खटके उडत होते. या लव्ह ट्रँगलमधून हत्येचा कट रचला गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातून विनोद तावडेंसह चौघांच्या नावाची घोषणा, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

पार्टी दरम्यान थरार; गळा दाबून केली हत्या

घटनेच्या दिवशी बिंदू, तिचे दोन मित्र आणि मोहन राव यांनी मिळून पार्टी केली होती. मद्यधुंद अवस्थेत असताना मोहन राव आणि बिंदू यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, धनुष आणि विनय यांनी मध्यस्थी करण्याऐवजी मोहन राव यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयने मोहन राव यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यानंतर आरोपींनी त्यांचे हात-पैर बांधून तोंड व नाकावर चिकटपट्टी (टेप) लावली. श्वास गुदमरल्यामुळे मोहन राव यांचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp