पुणे : भरदिवसा XUV कारमधून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण, पोलीस मागे लागताच आरोपींनी पळ काढला

मुंबई तक

Pune Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून XUV कारमधून या युवकाचे अपहरण करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मुलाच्या वडिलांनी मदतीसाठी संपर्क साधला.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : भरदिवसा XUV कारमधून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण

point

पोलीस मागे लागताच आरोपींनी पळ काढला

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात आज दुपारी खळबळजनक घटना घडली. एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले. मात्र  जेजुरी पोलीस स्टेशनआणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून XUV कारमधून या युवकाचे अपहरण करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मुलाच्या वडिलांनी मदतीसाठी संपर्क साधला.

हेही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात

माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशन आणि निरा पोलिसांनी जेऊर व निरा परिसरात तात्काळ नाकाबंदी केली. संशयित वाहनाचा शोध सुरू असताना जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार उसाच्या शेतात जाऊन अडकली. दरम्यान, अपहरणकर्ते घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी व्यापाऱ्याच्या मुलाची सुखरूप सुटका केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp