नवरा हुंड्यासाठी बायकोला मारायचा, नंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून... लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Crime News : एका विवाहितेनं पतीच्या विरोधात गंभीर तक्रार केली. नवरा तिला हुंड्याची मागणी करतो, तसेच मारहाण देखील करतो. मानसिक छळासारख्या अनेक धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. महिलेनं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नानंतर नवऱ्याला ड्राग्जचं व्यसन, पीडितेचा गंभीर आरोप

point

पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Crime News : एका विवाहितेनं पतीच्या विरोधात गंभीर तक्रार केली. नवरा तिला हुंड्याची मागणी करतो, तसेच मारहाण देखील करतो. मानसिक छळासारख्या अनेक धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. नवरा एवढ्यावरच न थांबता त्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेनं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. 

हे ही वाचा : प्रेयसी म्हणाली, 'तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, 10 लाख रुपये दे..' पुरुषानं विष पिऊन उचललं टोकाचं पाऊल

लग्नानंतर नवऱ्याला ड्राग्जचं व्यसन, पीडितेचा गंभीर आरोप

संबंधित प्रकरणात पीडितेचं म्हणणे आहे की, तिचे 14 जुलै 2025 रोजी विवाह झाला होता, परंतु लग्नानंतर तिच्या पतीचे वागने बदलले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी तिच्या पतीने तिला त्याच्या कुटुंबाबाबत आणि एकूण परिस्थितीबाबत खोटे कारण सांगितले होते. लग्नानंतर तिला कळले की, नवऱ्याला ड्रग्ज व्यसन आहे. यामुळे त्याने अनेकदा तिच्यावर नियमितपणे हल्ला आणि आत्याचार केला होता.

पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

संबंधित प्रकरणात आरोपीने पीडितेचे काही अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. नंतर तिला गप्प राहण्यास सांगितले होते. पीडितेचं म्हणणे आहे की, लग्नानंतर तिचा पती तिच्या माहेरच्या घरी आला होता आणि त्याने कुटुंबाकडे हुंडा म्हणून पैशांची मागणी केली होती. तिने विरोध केला असता, पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.

हे ही वाचा : फडणवीस साहेब, लंडनला निघालेला माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय, विशाखा सुभेदार यांनी हंबरडा फोडला, मदतीसाठी याचना

तक्रारीत असे देखील म्हटले होते की, तिला एका फ्लॅटमध्ये नेऊन बंद खोलीत मारहाण करण्यात आली. महिलेनं पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp